मुंबई

एसटीच्या पुरवठादारांची १५० कोटींची देणी प्रलंबित

CD

एसटीच्या पुरवठादारांची १५० कोटींची देणी प्रलंबित!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : ‘एसटीला सामान व इंधन पुरवणाऱ्या पुरवठादारांची अंदाजे १५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून यापुढे डिझेल व सामानासाठी गाड्या उभ्या राहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पीएफ, ग्रॅच्युइटी व एलआयसीसारख्या रकमा न भरणे ही जोखीम आहे. खिळखिळ्या एसटीचा आवाज सरकारला येत नाही का,’ असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले, ‘पुरवठादारांची अंदाजे १५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित असून यापुढे गाड्या उभ्या राहतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एसटीमध्ये विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. त्याची साधारण ३५० कोटी रुपये इतकी रक्कम दर महिन्याला होत असून सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती होत नाही. ही रक्कम एसटीला देताना सरकारने कधीच पूर्णपणे दिलेली नाही. सन २३-२४च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या रकमेतील ६१२ कोटी रुपये इतकी रक्कम अजूनही सरकारने दिली नाही. परिणामी, कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली रक्कम त्या त्या संस्थांना भरण्यात आलेली नाही. याशिवाय इतरही सर्व देणी प्रलंबित आहेत. यामध्ये भविष्य निर्वाह निधी ७५० कोटी रुपये, उपदान १,०५० कोटी रुपये, एसटी बँक ९० कोटी रुपये, रजा रोखीकरण ६० कोटी रुपये, एलआयसी १० कोटी रुपये, कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले पाच कोटी रुपये यांचा समावेश आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT