मुंबई

परतीच्या पावसाची हजेरी परतीच्या पावसाची हजेरी

CD

परतीच्या पावसाची हजेरी
उकाड्याने त्रासलेल्‍या मुंबईकरांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः ऑक्टोबर हिट जाणवू लागली असतानाच मुंबईत बुधवारी (ता. ९) परतीच्या पावसाने कमबॅक केले आहे. हलक्या सरींनी मुंबई ओलीचिंब झाली. त्‍यामुळे उकाड्याने त्रासलेल्‍या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाल्‍याचे दिसले.
पावसामुळे मुंबईत गारवा निर्माण झाला आहे. उद्या गुरुवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
सकाळपासून अधूनमधून ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी मळभ दाटले होते. संध्याकाळी शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. अचानक दाखल झालेल्‍या पावसामुळे मुंबईकरांची काहीशी तारांबळ उडाली. जवळ छत्री नसल्‍याने अनेकांना भिजतच आपले घर गाठावे लागले, मात्र ऑक्टोबर हिटच्या सुरुवातीला अचानक पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढला होता. आठवडाभरानंतर परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. मुंबई उपनगरातील अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. दुपारी चारच्या सुमारास हलक्या सरी पडल्या. कुलाबा येथे तीन मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे आठ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळपर्यंत मुंबईतील काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू होती. त्‍यामुळे सायंकाळी गरबा, दांडियासाठी घराबाहेर पडलेल्‍या तरुण-तरुणींचा काहीसा
हिरमोड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT