मुंबई

महिला व मोटरसायकल चालक गंभीर जखमी

CD

जुन्या मुंबई- पुणे मार्गावर अपघातात पाचवर्षीय मुलाचा मृत्यू
महिला व मोटरसायकलचालक गंभीर जखमी
पनवेल, ता. ९ (वार्ताहर) : वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला समोरून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवर पाठीमागे महिलेसह बसलेल्या पाचवर्षीय मुलाचा मृत्यू तर या महिला व मोटरसायकलचालक दोघेही गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री जुन्या मुंबई- पुणे मार्गावर पनवेल येथील दांडफाट्याजवळ घडली. पनवेल तालुका पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या जखमी मोटरसायकलचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या अपघातातील जखमी व्यक्ती अर्जुन काळू होला (३०) हा खालापूर येथील ठाकूरवाडीत राहण्यास असून तो मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास खालापूर येथून आपल्या मोटरसायकलवरून पनवेलच्या दिशेने जात होता. यावेळी रस्त्यावर आपल्या पाचवर्षीय लहान मुलासह उभ्या असलेल्या महिलेने अर्जुन होला याला दांडफाट्यापर्यंत सोडण्याची विनंती केली. त्यामुळे अर्जुन होला याने या महिलेला व तिच्या मुलाला आपल्या मोटरसायकलवर बसवले. त्यानंतर तो वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने आपली मोटरसायकल चालवून घेऊन जात होता. याचवेळी पनवेल येथून खोपोलीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारची त्यांच्या मोटरसायकलला धडक लागली.
या अपघातात मोटरसायकलचालकासह महिला व तिचा मुलगा हे तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र महिलेच्या पाचवर्षीय मुलाला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. या अपघातात गंभीर जखमी झालेली महिला बेशुद्धावस्थेत असल्यामुळे ही महिला व तिच्या मृत मुलाबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. या अपघातातील गंभीर जखमी अर्जुन होला याने वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने मोटरसायकल चालवून नेल्यामुळे हा अपघात घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी जखमी मोटरसायकलचालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Well Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 70 फूट खोल विहिरीत 25 टन वजनाचे पोकलँड कोसळले; विहिरीत बुडणाऱ्या मित्रासाठी ऑपरेटरने..., VIDEO पाहा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी संतापल्या! केवायसी करूनही मिळेनात पैसे; पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांत हेलपाटे..

तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

Pune News: सांत्वन नको; आम्हाला ठोस मदत करा; दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

SCROLL FOR NEXT