ट्रान्स्फॉर्मरच्या वायरचा शॉक लागून १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गरबा बघण्यासाठी ट्रान्स्फॉर्मरच्या भिंतीवर चढला आणि जीव गमावून बसला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : कल्याण पश्चिम साई चौक खडकपाडा येथे काल रात्री गेली २४ वर्षे चालत असलेला गरबा येथे एका तरुणाला डी.जे.तील विजेच्या वायरचा धक्का लागून त्याचा जागेवर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. कमलाकर खंडू नवाळे (वय १५) असे या मयत मुलाचे नाव असून तो दहावीत शिक्षण घेत होता. गरबा सुरू असताना ट्रान्स्फॉर्मरच्या भिंतीवर कमलाकर चढला होता; मात्र खाली उतरत असताना तोल गेल्याने ट्रान्स्फॉर्मरच्या वायरला हात लागल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत गरबा आयोजक हे सर्वस्वी जबाबदार असून याप्रकरणी हलगर्जीपणा व मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा खडकपाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.