मोह (खु) धरणातील पाणी इतरत्र नेण्यास
स्थानिक शेतकरी ग्रामस्थांचा विरोध
- गावपाड्यांवर मोठे पाणी संकट ओढवणार
विक्रमगड (बातमीदार), ता. ९ : विक्रमगड तालुक्यातील मोह (खु) लघु पाटबंधारातील पाण्यावर परिसरातील सात महसूल गावे, तसेच १० पाड्यांतील लोकवस्ती या पाण्यावर अवलंबन आहे. असे असताना साखरे, खुडेद, जांभा व सुकसाळे या ग्रामपंचायतमधील महसूल गावे व पाड्यांना या बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्याचा घाट घातला जात आहे. म्हणजेच एका ठिकाणची पाणीटंचाई दूर करण्यासाठी दुसरीकडे पाणी टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जर या ग्रामपंचायतींना मोह (खु) बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केल्यास सजन, शीळ, झडपोली, आलोंडे गावपाड्यांवर मोठे पाणी संकट ओढवणार आहे. त्यामुळे इतर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पाणी नेण्यास स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी यांचा तीव्र विरोध आहे.
मोह (खु) बंधाऱ्यातून पाणी साखरे, खुडेद,जांभा, सुकसाळे ग्रामपंचायतीतील गावपाड्यांना पुरवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, मात्र या योजनेद्वारे पाणी उचलण्यास सजन, शीळ, आलोंडे, झडपोलीमधील स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आलोंडे ग्रामपंचायत हद्दीतील मोह (खु) बंधाऱ्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साखरे खुडेद, जांभा, पोचाडे व सुखसाळे या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केल्यानंतर बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी होईल या भीतीने सजन, आलोंडे, झडपोली शीळ हद्दीत भविष्यात पाणीटंचाई निर्माण होईल, यासाठी येथील सर्व ग्रामस्थांनी योजनेद्वारे पाणी उचलण्यास विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी यांच्या कालच्या (ता. ८) पाहणी दौऱ्यात या भागातील शेतकरी, ग्रामस्थ यांनी निवेदन देऊन हे काम बंद करावे, असे निवेदन संबधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
......
१५ हजार नागरिकांना येथील पाणीसाठ्याचा उपयोग
या मोह (खु) बंधाऱ्यातून शीळ, झडपोली, सजन, आलोंडे व परिसरातील गाव पाडे अशा येथील जवळपास १५ हजार नागरिक लोकसंख्येला येथील पाणीसाठाचा उपयोग होत असतो. मोह (खु) पाटबंधाऱ्यातून भूमिगत पाइप कॅनलद्वारे शेतकऱ्यांना बारमाही पाण्याची सुविधा करून देण्यात आलेली आहे. त्यावर बारमाही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या बंधाऱ्यामधून ४०० ते ५०० शेतकरी पाणी उचलून शेतीवर उदरनिर्वाह करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.