ज्येष्ठ लेखक आनंद म्हसवेकर यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ नाट्य लेखक, दिग्दर्शक, निर्माता तसेच कवी आनंद म्हसवेकर (वय ६९) यांचे शनिवारी (ता. १२) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कांता, मुलगा विनय, मुलगी नीता, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी मुंबई येथे म्हसवेकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार होते, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवल्याने नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
डोंबिवलीतील शिवमंदिर रोड येथील वैकुंठ स्मशानभूमीत रविवारी (ता. १३) दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अभिनेते विजय गोखले, संतोष पवार, मुकेश जाधव, निता दोंदे, मनोहर सोमण, दिग्दर्शक शिरीष राणे, नाटककार कुमार सोहनी, देवेंद्र पेम, अभिनेत्री श्रद्धा मोहिते, प्रणव रावराणे, अमृता रावराणे उपस्थित होते. म्हसवेकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील म्हसवे या छोट्याशा गावात १९५५ साली झाला. त्यांच्या लेखनीतून २५ व्यावसायिक नाटके, १५ प्रायोगिक नाटके, ४२ एकांकिका, १४ चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद लेखन, १२ दूरदर्शन मालिकांसाठी २५०० हून अधिक भागांचे लेखन, कवितासंग्रह आणि ५ पुस्तके इतकी विपुल साहित्यसंपदेची निर्मिती केली होती. त्यांच्या ‘मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते यूएसए’ या आत्मचरित्र्याचे प्रकाशन रविवारी (ता. १३) सायंकाळी दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये होणार होते. महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक नाट्य महोत्सव २००८-०९ चा सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक नाट्य महोत्सव २००८-०९ चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार, १९९५चा चतुरंग सवाई लेखक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट लेखक आचार्य अत्रे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कार म्हसवेकर मानकरी ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.