मुंबई

वाढीव मतदार संख्येचा फायदा नक्की कोणाला?

CD

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच महिन्यांच्या काळात सुमारे ६८ हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. मोठ्या संख्येने ही नोंद झाल्याने वाढलेल्या मतदारांचा नेमका कोणाला फायदा होणार, याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.

२०१९ आणि २०२४ या दोन लोकसभा निवडणुकीदरम्यान पाच वर्षांच्या कालावधीत मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात अवघ्या १७ हजार नवीन मतदारांची नोंद झाली होती, मात्र यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ६८ हजार मतदार वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मतदार वाढीमागे सर्व इच्छुक उमेदवारांनी मतदार नोंदणीसाठी घेतलेली मेहनत कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. मेमधील लोकसभा निवडणुकीत शेकडो मतदारांची नावे मतदार याद्यांमधून नाहीशी झालेली आढळून आली होती. केंद्रावर जाऊनही यादीत नाव नसल्याने मतदार मतदानापासून वंचित राहिले होते. प्रत्येक निवडणुकीत हमखास मतदान करणाऱ्या मतदारांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश होता. परिणामी त्यांच्यात तीव्र नाराजी निर्माण झाली होती.

या नाराजीचा विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी सर्वच इच्छुक उमेदवार सावध झाले. त्यामुळे प्रत्येकाने मतदार नोंदणीसाठी स्वतंत्र अभियानच राबवले. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मतदार यादीतून नावे वगळली गेलेल्या मतदारांचा शोध घेतला व त्याचे पुन्हा अर्ज भरून घेतले, त्याचप्रमाणे यादीत नावे नसलेल्या मतदारांकडूनही अर्ज भरून घेतले. या पद्धतीने मेहता गटाने तब्बल ३० ते ३५ हजार मतदार नोंदणी अर्ज भरून घेतले. भाजपकडून इच्छुक असलेले आणखी एक उमेदवार ॲड. रवी व्यास यांनीदेखील सुमारे २५ हजार मतदारांची नोंदणी केली, तर गीता जैन यांनीदेखील मतदार नोंदणी करवली. काँग्रेसदेखील या स्पर्धेत मागे नव्हती.

मविआकडून निवडणूक लढविण्याची तयारी करत असलेले मुझफ्फर हुसेन यांच्या कार्यकर्त्यांनी सुमारे २५ हजार नवीन मतदारांची नोंदणी करवली. नोंदणी अर्ज भरलेल्या शंभर टक्के मतदारांची नावे यादीत आली नसली तरी नावे समाविष्ट झालेल्यांचे प्रमाण मोठे आहे. याचा परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल ६८ हजार मतदार वाढले आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही याच पद्धतीने मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्या वेळी २००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत २०१४ मध्ये तब्बल ४० हजार मतदार वाढले होते. त्या वेळी सर्वात जास्त मतदार नोंदणी नरेंद्र मेहता यांनी करवून घेतली होती. त्याचा त्यांना चांगलाच फायदा झाला व ते २०१४ च्या निवडणुकीत चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत वाढलेले ६८ हजार मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात, यावर विजयाचे गणित ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Account vs Savings Account Benefits : दर महिन्याला पगार येतो? मग सॅलरी अकाउंटचे हे १० मोठे फायदे तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत!

Mumbai Indians च्या कोचने रचला इतिहास! किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भूकंप आणला...

Share Market Crash: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1,438 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 5.24 लाख कोटी बुडाले

चाणक्य नीतीनुसार आयुष्यात मोठे संकट येण्यापूर्वी दिसतात 'ही' ५ लक्षणे; वेळेवर ओळखा आणि सावध व्हा!

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; काय केले आवाहन?

SCROLL FOR NEXT