वसई, ता. १७ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड आणि आनंदाची होणार आहे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून, दिवाळी सणाच्या निमित्ताने तीन हजार ३२५ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याची घोषणा केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कामकाजाचे २३७ दिवस विचारात घेऊन हे अनुदान निश्चित करण्यात आले आहे. या योजनेसाठी महापालिकेवर एकूण सहा कोटी ६५ लाख रुपये खर्च होणार आहे.
२०२२-२३ या वर्षात कर्मचाऱ्यांना १५ हजार या दराने सानुग्रह अनुदान दिले होते, मात्र यंदा वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकटामुळे अनुदानाच्या दरात वाढ करण्यात आलेली नव्हती. यंदा वसई-विरार महापालिकेच्या करवसुलीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्यात आली. स्थायी आस्थापनेवरील वर्ग ३ आणि वर्ग ४ चे कर्मचारी, ठोक वेतनावर कार्यरत कर्मचारी, पेल्हार धरण योजनेवरील कर्मचारी, तसेच कंत्राटी आणि रोजंदारी कर्मचारी यांचा या योजनेत समावेश आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघटनांनीसुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल, असे मत व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या काळात दर कमी करण्यात आले होते, मात्र आता परिस्थिती सुधारल्याने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य चीज मिळावे, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या करवसुलीत वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना यावर्षी वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- अनिलकुमार पवार,
आयुक्त तथा प्रशासक, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.