मतदानाचा टक्का वाढवण्यावर भर
निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मागील विधानसभा व नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेपेक्षा मतदानाचा टक्का कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांनी दिली. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २४ बाय ७ या पद्धतीने नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. त्यासाठी ०२२-२०८१२८३६ हा दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा व मतदान वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील वेळेस या मतदारसंघात ४९.०९ टक्के मतदान झाले होते; मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ५६ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे आता मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघात निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी २० समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच नऊ फ्लाईंग स्कॉडच्या टीम सज्ज असतील, असेही त्यांनी सांगितले, तसेच या मतदारसंघात पुरुष मतदार १,८०,०३८, स्त्री मतदार १,५८,२६१, इतर २१ असे एकूण ३३८३२० मतदार आहेत, तर जेंडर रेशो ८७९, सैनिक मतदार १३३, एनआरआय १६, १८ ते १९ वयोगटातील ६,६१४, दिव्यांग १,२६२ आणि ८५ वयोगटापुढील २,६९६ मतदार आहेत. या विधानसभा मतदारसंघात ३६६ मतदान केंद्र आहेत. त्यात पदनिर्देशित ठिकाण ८९, पक्क्या इमारतीतील २०६, पार्टीशिनमधील मतदान केंद्र १११, मंडप ४९, गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्र २२ आणि झोपडपट्टी भागात एकही मतदान केंद्र ठेवलेले नाही, तसेच नेपच्युन इलेमेंट आयटी पार्क मोकळ्या जागेत मंडप या ठिकाणी महिला मतदान केंद्र ठेवले आहे. ती संख्या ९५९ एवढी आहे. पीडब्ल्यूडी मतदान केंद्र गांधीनगर येथे आहे. येथील मतदारसंख्या १०६१, युवा मतदान केंद्र रामबाग संभाजीनगर मतदारसंख्या १०३६ एवढी आहे.
दरम्यान, या मतदारसंघात ३६६ मतदान केंद्र असून, त्यात बॅलेट युनिट ४३९, युनिट कंट्रोलन ४३९ आणि व्हीव्हीपॅट ४७६ असणार आहे, तर या मतदारसंघातील मतमोजणी ही आयटीआय रोड नं. २८, वागळे इस्टेट येथे होणार आहे. २३ नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, तर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नऊ फिरती पथके, तीन स्थिर पथके सर्वेक्षण पथके असणार असून ती टाटा फायनेज चेकनाका, मुलुंड मॉडेला चेकनाका, आनंद नगर चेकनाका येथे असणार आहेत, तर सहा व्हिडिओ सर्वेक्षण पथके, एक व्हिडिओ देखरेख पथक स्थापित केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.