मुंबई

चिखले गावात बिबट्याची दहशत

CD

बोर्डी, ता. १७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील चिखले गावातील विजयवाडी येथे मंगळवारी (ता. १५) रात्री बिबट्याने घरानजीक बांधलेल्या बकरीची शिकार केली. त्यानंतर बोर्डी वनक्षेत्रपाल आर. एस. सारणीकर यांच्या नेतृत्त्वाखाली पंचनामा करून तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आहेत. या घटनेने चिखले आणि घोलवड गावातील शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

मंगळवारी रात्री लक्ष्मी आरदोरी या महिलेच्या शिवारातील झोपडीनजीकच्या गोठ्यातील दोन बकऱ्या गायब झाल्या हाेत्या. त्यापैकी एक बकरी बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचे बोर्डी वन परिक्षेत्रपाल सारणीकर म्हणाले. त्याबाबत पंचनामा करण्यात आला असून महिन्याभरात नुकसाभरपाईची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्या परिसरातील एका शेतात बिबट्याचे ठसे आढळले असून तीनपैकी एकही कॅमेऱ्यात बिबट्या आढळलेला नाही.

परिसरात भातकापणीच्या हंगामाला प्रारंभ झाला असून चिकू बागायती असल्याने शेतकरी आणि मजूर वर्गात भीती पसरली आहे. त्याकरिता नागरिकांना दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन वन विभागाकडून करण्यात आले. गस्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ वन विभागाला द्यावी, असे आवाहन केले आहे. मानद वन्यजीव रक्षक हार्दिक सोनी, वनपाल प्रणव भोई, वाइल्डलाइफ कन्झरव्हेशन ॲण्ड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य प्रतीक वाहूरवाघ, रेमंड डिसोझा, सागर पटेल, एरिक ताडवाला, तसेच घोलवड पोलिस ठाण्याचे कर्मचारी, वन कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! खरेदीदारांना झटका; तुमच्या शहरात किती झाला भाव?

Maharashtra Land News: भूदान जमिनींचे भवितव्य टांगणीला; कोट्यवधींचे व्यवहार; मूळ लाभार्थींचा हक्क संपल्याचा दावा

Latest Marathi News Update : कर्नाटकातील मंड्या येथे कार आणि ट्रकची धडक; २ जण ठार, ४ जखमी

Nepal earthquake Today : नेपाळमध्ये ५.३ तीव्रतेचा भूकंप; भारतासह भूतान आणि चीनमध्येही धक्के, पालघरही हादरले

Maharashtra Police: कर्तव्याच्या मैदानातून टेनिस कोर्टवरही बाज; डीवायएसपी शंकर शेळके यांनी उंचावला ‘लोहमार्ग’चा मान

SCROLL FOR NEXT