बहाण्याने वृद्ध महिलेला लुटले
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : टाइम विचारण्याच्या बहाण्याने एका लुटारूने ६७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन खेचून पलायन केल्याची घटना बुधवारी (ता. १६) सायंकाळी सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी या लुटारूच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
आशा ढोबळे या वाशी सेक्टर-३० ए मधील सिलीकॉन टॉवर इमारतीत कुटुंबासह राहतात. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अशा ढोबळे या त्यांची ११ वर्षांची नात आदिती हिच्यासोबत फुले आणण्यासाठी सानपाडा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पायी चालत जात होत्या. या वेळी आशा ढोबळे व त्यांची नात एमजीएम कॉलेजलगतच्या कॉर्नरजवळ थांबल्या होत्या. त्यांच्याजवळ आलेल्या एका व्यक्तीने त्यांना टाइम विचारण्याचा बहाणा केला. आशा यांनी त्याला वेळ सांगितली असता लुटारूने अचानकपणे त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची एक लाख रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून रेल्वे रुळावरून वाशीच्या दिशेने पलायन केले. याप्रकरणी आशा ढोबळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.