मुंबई

उल्हासनगर महापालिकेत तिघांना सहायक आयुक्तांची पदोन्नती

CD

उल्हासनगर महापालिकेत तिघांना सहाय्यक आयुक्तांची पदोन्नती
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) ः आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशान्वये उल्हासनगर महारपालिकेच्या आस्थापनेवरील तिघांना सहाय्यक आयुक्तपदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
विकास ढाकणे यांनी सामान्य प्रशासन विभागाची अनेक वर्षांपासून रखडलेली पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान केलेली असून पहिल्या टप्प्यात तीन सहाय्यक आयुक्त, दोन अधीक्षक, १२ वरिष्ठ लिपिक, सहा वीजतंत्री व १७ तारतंत्री या पदांवर कर्मचाऱ्यांची पदोन्नती करून त्यांना दिवाळी भेट दिली. त्यात मालमत्ता विभागात अधीक्षकपदावर कार्यरत असलेल्या अलका पवार यांची पदोन्नती करून त्यांची प्रभाग समिती एकच्या सहायक आयुक्तपद सोपवण्यात आले आहे. आधार व जनगणना विभागाच्या अधीक्षक सलोनी निवकर यांची पदोन्नती करून त्यांची प्रभाग समिती तीनच्या सहाय्यक आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे विशाल कदम यांची पदोन्नती करून त्यांची निवडणूक, पर्यावरण व जनगणना विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नती करण्यात आलेल्या सर्वांच्या वेतनश्रेणीमध्येही वाढ झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambaghat Tunnel Project : 2,500 कोटी रुपये खर्च अन् 7 किमी लांबी...; आंबाघाटातील प्रस्तावित सहापदरी बोगदा कसा असेल? केंद्राकडे 'त्या' तीन पर्यायी अलाइनमेंट सादर

Wedding Muhurat 2027 : तुळशी विवाहानंतर सनई-चौघडे वाजणार; नव्या वर्षात सर्वाधिक मुहूर्त, पाहा जानेवारी ते जून 2027 चे संपूर्ण वेळापत्रक

Ganpatipule Tourism : सलग सुट्ट्यांमुळे कोकण 'हाऊसफुल्ल'! गणपतीपुळ्यात अवघ्या 3 दिवसांत तब्बल 60 हजार पर्यटकांची हजेरी, वॉटर स्पोर्ट्ससह आरे-वारेतील 'या' थरारक खेळाला सर्वाधिक पसंती

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT