मुंबई

पत्नीची हत्या करणारा फरार नवरा गजाआड

CD

पत्नीची हत्या करणारा फरार नवरा गजाआड
अंबरनाथ, ता. १७ (बातमीदार) ः पत्नीची हत्त्या करून फरार झालेल्या पतीला घटना घडल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. विकी लोंढे याला गुरुवारी (ता. १७) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अंबरनाथच्या पालेगाव परिसरात राहणाऱ्या विकी लोंढे (२७) याने त्याच्या पत्नीची ८ ऑक्टोबरला हत्या केली होती. हत्त्या केल्यानंतर फरार झालेल्या विकी लोंढे याला शिवाजीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी येथून अटक केली आहे. कौटुंबीक वादातून विकीने पत्नी रुपाली हिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी पोलिसांची विविध पथके तयार करून विकीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. विकी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असल्याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सिराज शेख, पोलिस हवालदार भागवत सैंदाने आदींनी विकीला ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TVK MLA Arul Vignesh : सत्ताधारी आमदाराकडून महिला जिल्हाधिकाऱ्याला अश्लील मॅसेज, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

W,W,W,W! महाराष्ट्राची डबल हॅटट्रिक; भिवंडीच्या विवेक शेलारची भन्नाट गोलंदाजी, टेनिस बॉल क्रिकेटचा नायक, SMATमध्ये चमकला

IFFI 2026: ‘इफ्फी’च्या कोकणी चित्रपट विभागात लघुपटांसह १२ चित्रपटांचा समावेश; गोव्यातील तरुण सर्जनशीलतेचा ‘लघु’अविष्कार

Latest Marathi News Update : 'जो मोठा भाऊ असतो, तोच मुख्यमंत्री होतो' - गृहमंत्री अमित शहा

भाऊ... दादा... साहेब फ्लेक्स काढा! पुणे महापालिकेची अनधिकृत फ्लेक्सवर भन्नाट मोहिम, पुणेकरांनो फोटो काढा अन् 'अशी' करा तक्रार

SCROLL FOR NEXT