मुंबई

कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर

CD

मोखाडा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भातशेतीचे नुकसान झाले आहे. याबाबत ‘सकाळ’ने रविवारी (ता. २०) बातमी प्रसिद्ध करून विदारक वास्तव समोर आणले होते. त्याची दखल घेत तालुका कृषी अधिकारी आकाश सोळुंके व त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारली. तसेच, रविवारी सुट्टीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संध्याकाळपर्यंत नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
मोखाडा तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. हे विदारक वास्तव ‘सकाळ’ने २० नोव्हेंबरच्या अंकात ‘भातपीक तरंगले पाण्यावर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून समोर आणले आहे. त्याची तातडीने दखल घेत कृषी अधिकारी आकाश सोळुंखे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी थेट शेतकऱ्यांचे बांध गाठले. याप्रसंगी सोळुंखे यांच्यासह कृषी पर्यवेक्षक अमोल म्हैसधुणे, निर्मला कुऱ्हाडे, रामराव जगताप व तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यकांनी काकडोशी, शिरसगाव, डोल्हारा, गोंदे बुद्रुक, केळीचा पाडा, कोलद्याचा पाडा, मोरांडा, पोशेरा, वाकडपाडा, कारेगाव, सायदे, धामणशेत, कोसिमशेत, करोळ या गावांतील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे. उर्वरित भागांची पाहणी दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘पीकविमा कंपनीशी संपर्क साधावा’
तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. ज्या लाभार्थ्यांनी पीकविमा घेतलेला आहे, त्यांना १४ हजार ४४७ या टोल फ्री क्रमांकावर पीकविमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधून इंटिमेशन कॉल करण्याचे सूचित केले आहे. जर क्रमांक उपलब्ध झाला नसल्यास नुकसानग्रस्त क्षेत्राचे अक्षांश, रेखांशसह फोटो, तसेच शेतकऱ्यांचा आधार कार्ड, सातबारा, आठ अ चा उतारा आणि बँकेचे पासबुक आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडून तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा संबंधित गावाचे कृषी सहाय्यक यांच्याकडे देण्याचे आवाहन केले आहे.

‘सकाळ’मध्ये शेतीच्या नुकसानीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी आणि तहसीलदारांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार टीमने रविवारी सुट्टीच्या दिवशी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. उभ्या पिकांचे नुकसान कमी असून, कापून शेतात ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. या नुकसानीची आकडेवारी येत्या दोन दिवसांमध्ये सरकारला उपयुक्त अभिप्रायासह सादर करण्यात येईल.
- आकाश सोळुंखे, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा


शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी खासदार शेतात
नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडणार
मोखाडा, ता. २२ (बातमीदार) : मोखाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालत खरीप पिकाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे अस्मानी संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांचे अश्रू पुसण्यासाठी खासदार डाॅ. हेमंत सवरा यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली आहे.
मोखाड्यात चार ते पाच दिवसांपासून परतीचा, मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे उभे पीक शेतातच आडवे झाले आहे. कापून शेतात ठेवलेले पीक भिजून काळे पडून कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक डोळ्या देखत वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वर्षभरातून एकदाच एकमेव खरिपाचे पीक घेतले जाते. त्यावरच शेतकऱ्यांना कुटुंबाची वर्षभर गुजराण करावी लागते. शेतीचे नुकसान झाल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवणार आहे.
नुकसानग्रस्तांना दिलासा मिळावा आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी खासदार डाॅ. सवरा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यांनी शिरसगाव, आडोशी, बोटोशीपैकी बेलपाडा, कुर्लोदपैकी मानी पाडा, पेढेपाडा या ठिकाणी जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत.

शेतीच्या नुकसानीची स्थिती भयानक असल्याचे प्रत्यक्ष दिसत आहे. आचारसंहितेचा बडगा असला तरी, शेतकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मांडणार आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जाईल. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न असणार आहे.
- डाॅ. हेमंत सवरा, खासदार, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT