मुंबई

आर्थर रोड कारागृहातून पळालेल्‍या आरोपीस अटक

CD

आर्थर रोड कारागृहातून पळालेल्‍या आरोपीस अटक
विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल
अंधेरी, ता. २२ (बातमीदार) ः आर्थर रोड कारागृहात नेताना शुक्रवारी पळून गेलेल्या अमोल पांडुरंग शेलार या ३८ वर्षांच्या आरोपीला शनिवारी पहाटे खार दांडा परिसरातून खार पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
अमोल हा त्याच्या आईला भेटण्यासाठी आला होता. या वेळी तिथे आधीच पाळत ठेवलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी ना. म जोशी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितले. अमोलविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात बंदिस्त होता.
शुक्रवारी त्याला विशेष सत्र न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. सुनावणी संपल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात नेण्यात येत होते. या वेळी आर्थर रोड कारागृहाजवळ तो पोलिस पथकाला धक्काबुक्की करून पळून गेला होता. त्यामुळे ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अमोलविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. शोधमोहीम सुरू असताना अमोल हा त्याच्या आईला भेटण्यासाठी खारदांडा परिसरात शनिवारी पहाटे आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या पथकातील वैभव काटकर, हनमंत कुंभारे, मनोज वैद्य, भरत काच्चे, दिनेश शिर्के, आनंद निकम, अजीत जाधव यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून अमोल शेलारला अटक केली. गुन्हा दाखल होताच काही तासांत अमोल पकडला गेला, त्यामुळे त्याला पुढील कारवाईसाठी ना. म जोशी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT