मुंबई

आयारामांना फिरकू देणार नाही!

CD

आयारामांना फिरकू देणार नाही!
शैलेश वडनेरे यांचा इशारा; राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाचा राजीनामा
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : दीड वर्षापूर्वी राज्यातील प्रमुख दोन पक्षात झालेल्या फुटीचे पडसाद यंदाच्या विधानसभा निवडणुकीवर पडताना दिसत आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघांतदेखील याचे परिणाम दिसून येत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळेल, याची खात्री होती; मात्र सुभाष पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे नाराज असलेल्या वडनेरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सुभाष पवार यांच्या पक्षप्रवेशाची कुणकुण लागताच आयाराम उमेदवाराला संधी मिळाली, तर त्याला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा धमकीवजा इशाराही शैलेश वडनेरे यांनी दिला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात सुभाष पवार यांचा सोमवारी पक्षप्रवेश झाल्यावर आपल्याला उमेदवारी मिळेल, याची आशा मावळल्याने नाराज वडनेरे यांनी पुन्हा हाच बाणा कायम ठेवत सुभाष पवार यांच्यासह पक्षाला इशारा दिला आहे, तसेच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे यंदा मुरबाड विधानसभा मतदारसंघात वेगळाच संघर्ष पाहायला मिळणार आहे.

पडत्या काळात राष्ट्रवादी पक्षाला शहरात बळकटी देण्याचे काम आम्ही केल्याचा दावा वडनेरे यांनी केला आहे. जेव्हा पक्ष फुटला तेव्हा निव्वळ १० कार्यकर्ते सोबत घेत पुढे कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली. त्यातच लोकसभा निवडणुकीत बदलापूर शहरातून मतदानाची चांगली टक्केवारी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी दिलेल्या खासदार सुरेश म्हात्रे यांना मिळवून दिली. निष्ठेने पक्षाचे काम करूनदेखील पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याची जाण ठेवली नाही, असा आरोप व नाराजी शैलेश वडनेरे यांनी व्यक्त केली आहे. सुभाष पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांनी आपली नाराजी पुन्हा उघड केली, तसेच यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आयाराम उमेदवाराला संधी मिळाली, तर प्रचारावेळी त्याला मतदारसंघात फिरू देणार नाही, ही भूमिका आम्ही आता कायम ठेवली आहे. आयाराम उमेदवाराला आम्ही आक्रमकपणे विरोध करणार, अशी भूमिका वडनेरे यांनी घेतली आहे.

अपक्ष निवडणूक लढवणार
पक्षाने आमची आमच्या निष्ठेची दखल घेतली नाही, त्यासाठी पक्षाच्या सभासद आणि पक्ष शहराध्यक्षपदाचा वडनेरे यांनी राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे, तसेच ही निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे वडनेरे यांनी या वेळी जाहीर केले. ओबीसी समाजातील सगळ्या संघटना, तसेच महाविकास आघाडीशी संलग्न असलेल्या मुरबाड ग्रामीण पट्ट्यातील सगळ्या संघटना, माझ्यासोबत आहेत. या सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन मी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्या पक्षाला पाडण्याचा प्रयत्न सुभाष पवार यांनी केला. त्याच पक्षात आता त्यांनी प्रवेश घेतला आहे. हे अंतर्गत साटेलोटे आहे. वडिलांच्या पुण्याईवर ठेकेदारी करत असलेल्या आयाराम उमेदवाराला पक्षाने उमेदवारी देणे हे निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे अशा पक्षातून बाहेर पडणे चांगले, अशी माझी भूमिका असल्याने मी राजीनामा दिला आहे.
- शैलेश वडनेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Expansion : मोदी कॅबिनेटमध्ये होणार मोठा गेमचेंजर! सर्वांच्या नजरा 'या' दोन नावांवर, अमित शाहांच्या भेटीनंतर दिल्लीत खळबळ!

SBI Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 84 पदांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची शेवटची तारीख

'लाल लाल कलरची बांगडी...'वर पाठराखीणच्या अभिनेत्रींचा भन्नाट डान्स; संजू राठोड म्हणाला, 'खूप भारी' Viral Video

Rohini Devba : पोरीसाठी बापानं बकरी विकून विमानाचं तिकीट काढलं; हरियाणाच्या 9 पैलवानांना धूळ चारणाऱ्या महाराष्ट्राच्या लेकीची जागतिक भरारी, पण पैशांअभावी अडलं 'स्वप्न'

FIFA World Cup: पुण्यापेक्षाही लहान देश, पण पराक्रम गाजवलाय मोठा! पदार्पणातच गाठली नॉकआऊट, आता मेस्सीच्या अर्जेंटिनाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT