मुंबई

पैठणीमुळे महिलांचा आनंद द्विगुणित

CD

पनवेल, ता. २२ (बातमीदार) : ‘सकाळ’ माध्यम समूह व श्री दीपक साडीज् पनवेल यांच्या मार्फत नवरात्रोउत्सवामध्ये महिलांसाठी नवरात्र नवरंग पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील पैठणी स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी (ता. २३) पनवेल येथील ‘श्री दीपक साडीज्’च्या दालनात पार पडला. पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली, खालापूर येथील अनेक महिलांनी यात भाग घेतला होता.
नवरात्रोत्सवाच्या काळात नवरंगांचा उत्सव अधिक आनंददायी होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ‘सकाळ’च्या वतीने ‘सकाळ’ आणि ‘श्री दीपक साडीज्’च्या वतीने आयोजित केलेल्या पैठणी स्पर्धेला महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या स्पर्धेमुळे महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळाली आहे. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात विजेत्या महिलांना पैठणी साड्या बक्षीसस्वरूपात देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पनवेलमधील ज्येष्ठ समाजसेविका व लेखिका सुनीता जोशी यांची उपस्थिती लाभली. महिलांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत, अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कृतीशील होणे गरजेचे असल्याचा सल्ला सुनीता जोशी यांनी दिला. बक्षीस वितरण समारंभाच्या निमित्ताने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या विविध क्षेत्रांतील महिलांनी या वेळी आपले अनुभव कथन केले. समाजसेविका सुनीता जोशी, श्री दीपक साडीचे मालक निखिल सोनी, दीपक सोनी व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी साड्या बक्षीस देण्यात आल्या. या वेळी अभिनेत्री पूजा रायबागी यांची उपस्थिती लाभली.
---------
नवरात्र नवरंग पैठणी स्पर्धेमध्ये ‘श्री दीपक साडीज्’ला सहयोगी करून संधी दिल्याबद्दल ‘सकाळ’ माध्यम समूहाचे आभार. दांडगा जनसंपर्क असल्याने या पुढेही आम्ही ‘सकाळ’ समूहाच्या प्रत्येक कार्यक्रमात सोबत काम करत राहू.
- निखिल सोनी, श्री दीपक साडीज्, पनवेल
------------
नवरात्रोउत्सवात दररोज नऊ रंगाच्या नऊ साड्या नेसणे म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. त्यातही ‘सकाळ’ने विजेत्या महिलांना पैठणी बक्षीस दिल्याने हा आनंद द्विगुणीत झाला आहे. आम्हा स्त्रियांना ‘सकाळ’ माध्यम समूहाने एक प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
- सारिका बोडके, प्लॅटीनम ग्रुप रोडपाली
------------
नवरात्रीचा उत्साह पैठणीच्या बक्षिसाने द्विगुणीत झाला आहे. ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये नऊ दिवस प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांतून ‘सकाळ’ने गृहिणींचा सन्मान केला आहे. आम्हाला ‘सकाळ’च्या पुढील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास नक्कीच आवडेल.
- भारती देसारी, पैठणी विजेती महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT