मुंबई

फटाकेमुक्त सुरक्षित दिवाळी साजरी करू या

CD

वाशी, ता. ३० (वार्ताहर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बेलापूर शाखेतर्फे ‘फटाकेमुक्त दिवाळी, आनंदी व सुरक्षित दिवाळी’ या विषयावर शनिवारी (ता. २६) संवादसत्र पार पडले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पनवेल तालुक्यातील रोहिंजण येथील राजा प्रसेनजित पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना फटाकेमुक्त दिवाळीचे महत्त्व समजावून सांगितले.
फटाके न फोडताही दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे असून दिवाळीत फटाके फोडल्यामुळे त्याचे पर्यावरणावर अनेक दुष्परिणाम होतात. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, माती प्रदूषण तसेच जल प्रदूषण होते. त्यामुळे सण साजरे करून आनंद मिळवण्याच्या आपल्या मूळ उद्देशाला बाधा येते. त्यामुळेच हा मूळ उद्देश जोपासला जावा, याकरिताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाकेमुक्त दिवाळी अभियान दरवर्षी राबविण्यात येते. या संवादसत्राला अंनिसचे कार्यकर्ते व नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष अशोक निकम, बेलापूर शाखा कार्याध्यक्ष महेंद्र राऊत, ज्योती क्षीरसागर, ए. एच. शहा व राजेंद्र पंडित उपस्थित होते.

-------------
पक्ष्यांना बहिरेपणासह मृत्यूचे संकट
फटाके बनविण्यासाठी लागणारे रसायन आणि त्यामुळे लोकांना होणारा त्रास, फटाक्यांच्या धुरामुळे बळी जात असलेले पक्षी आणि माणसांना होणारे विविध आजार या विषयावर महेंद्र राऊत व राजेंद्र पंडित यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांच्या आवाजामुळे व धुरामुळे पक्ष्यांना बहिरेपणा तसेच मृत्यू ओढावू शकतो. या कार्यक्रमात राजा प्रसेनजित पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजचे १८० हून अधिक विद्यार्थी आणि आठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT