मुंबई

लक्ष्मीपुजनाचा उदय तिथीला मुहुर्त

CD

लक्ष्मीपूजनाचा उदय तिथीला मुहूर्त
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : दिवाळीतील अमावस्येचे विशेष महत्त्व असून देवी लक्ष्मीसोबत, धनदेवता कुबेर आणि गणपतीचे पूजन करणे शुभ मानले जाते. वैदिक पंचांगानुसार, हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो. त्यामुळे उदय तिथी महत्त्वाची असते. लक्ष्मीपूजनानिमित्त नवीन केरसुणी, हिशोब चोपड्या खरेदी करणाऱ्यांची लगबग सुरू होती.
लक्ष्मीपूजनात केरसुणीला विशेष मान आहे. शिंदीच्या झाडापासून तयार केलेल्या केरसुणीबरोबरच प्लॅस्‍टिकच्या धाग्यापासून कारखान्यात तयार केलेल्या रंगीबेरंगी केरसुण्या बाजारात दाखल आहेत. त्याचबरोबर नवीन चोपडीचे पूजन करून व्यावसायिक समृद्धीसाठी व्यावसायिक प्रार्थना करतात. लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
यंदा दिवाळीच्या तिथीवरून गोंधळाचे वातावरण आहे. नेमका लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त कधी, ३१ ऑक्टोबर की १ नोव्हेंबर, याबाबत संभ्रम आहे. वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो. त्यामुळे उदय तिथी खूपच महत्त्वाची ठरत असून १ नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून रात्री आठ वाजून ३५ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त असल्याचे सांगण्यात आला आहे. पंचांगातही हा मुहूर्त सांगितला गेला आहे. या दोन तासांत जवळपास १२ मिनिटांचा सर्वात शुभमुहूर्त आहे. हा मुहूर्त सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि सहा वाजून १६ मिनिटांनी संपेल. त्यामुळे सर्व पूजेची तयारी आधीच करून या मुहूर्तावर पूजन करावे. दुसरीकडे या दिवशी शुक्रवार असून स्वाती नक्षत्र आहे. त्यामुळे देवी लक्ष्मीसोबत शुक्राचा प्रभाव असणार आहे. शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते.

३१ ऑक्टोबर रोजी चतुर्दशी समाप्ती दुपारी ३.५३ मिनिटे असून नंतर अमावस्या सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ६.१७ मिनिटांपर्यंत अमावस्या आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्येची अधिक व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी अमावस्या प्रदूषकात अल्पकाळ असताना १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे, असे दाते पंचांगात सांगण्यात आले आहे. तसेच, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास २४ मिनिटे या कालावधीत नेहमीप्रमाणे लक्ष्मीपूजन करता येईल.
- मिथुन वैद्य, पुरोहित, चौल- अलिबाग

.................

अलक्ष्मीचे उच्चाटन करणाऱ्या केरसुणीची पूजा
महाड, ता. ३१ (बातमीदार) : अस्वच्छता ही अनेक रोगांचे मूळ असते. आपल्या परंपरेमध्येदेखील शरीर स्वच्छता व परिसर स्वच्छतेला विशेष महत्त्व दिले आहे. आपले घर व परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाला केरसुणीची गरज लागते. अशा या केरसुणीचे पूजन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करून तिला मोठा सन्मान देत तिच्याप्रति ऋण व्यक्त केले जाते. लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या छोट्या केरसुणींबरोबरच झेंडूची फुले, तोरण खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे.
प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही त्याच्या अंगी असणाऱ्या चांगल्या गुणांवर होत असते. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची पूजा केली जात असताना, अलक्ष्मीला घरातून बाहेर काढून टाकण्याचे काम झाडू करत असते. अलक्ष्मी ही अशुभ, दुर्भाग्य व अपयशाची देवता मानली जाते. माणसाच्या अंगी असलेले आळस, मत्सर, अस्वच्छता भ्रष्टाचार, व्यसन, अनिती असे अनेक दुर्गुण या अलक्ष्मीकडे आहेत. समुद्रमंथनातून जे हलाहल निर्माण झाले, त्यातूनच अलक्ष्मीचा जन्म झाला, असे पुराणात सांगितले जाते. कल्कीपुराणानुसार अलक्ष्मी ही कलीराक्षसाची दुसरी पत्नी होती. अलक्ष्मीचे वाहन गाढव असून तिच्या हातात झाडू हे आयुध आहे. घरामध्ये वास करणाऱ्या लक्ष्मीला अस्वच्छता व वाईट गुण आवडत नाहीत, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण करणे आवश्यक असते, म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा केली जाते.

......................

पोयनाडमध्ये खरेदीचा उत्साह
पोयनाड, ता. ३१ (बातमीदार) ः लक्ष्मीपूजनाच्या खरेदीसाठी पोयनाड बाजारपेठेत दोन दिवसांपासून झुंबड उडाली आहे. पूजेसाठी प्रामुख्याने झेंडूच्या फुलांची आरास केली जाते. याशिवाय तयार हारांनाही मागणी आहे. दिवाळीच्या रांगोळीसाठी लागणारे विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, फटाके, रेडिमेड फराळाच्या खरेदीला ग्राहकांनी पसंती दिली. सध्या सोने ८० हजार आणि चांदीने लाखाचा टप्पा पार केला आहे. तरी ग्राहकांकडून उत्‍सवानिमित्त खरेदी होत असल्‍याचे दिसते.

..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill: वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT