मुंबई

भाजपने मराठी माणसांचे दोन पक्ष फोडले : जयंत पाटील

CD

भाजपने मराठी माणसांचे दोन पक्ष फोडले : जयंत पाटील
शहापुरात महाविकास आघाडीची सभा
खर्डी, ता. १७ (बातमीदार) : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व राष्ट्रवादी हे मराठी माणसांनी उभे केलेले दोन राजकीय पक्ष भाजपने तोडण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले. ते शहापूरमध्ये आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते. तसेच, यावेळी शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी भावली पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण करणार असल्याचे म्हटले.

‘बटेंगे तो कटेंगे’ हे आम्हाला मान्य नसल्याचे अजित पवार सांगतात. मग भाजपसोबत का गेले हे महाराष्ट्राला माहिती आहे. कोणताही वैचारिक भाव पाहून अजित पवार भाजपसोबत गेलेले नाहीत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे काम स्वच्छ होते. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची जगभरात दखल घेतली गेली; परंतु दुर्दैवाने काही आमदार फोडले गेले व स्वच्छ प्रशासन असलेले सरकार भाजपने पाडल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. महायुतीच्या सरकारने श्रीमंताच्या खरेदीवर कमी जीएसटी व शेतकऱ्यांच्या अवजार खरेदीवर जास्त जीएसटी लावण्याचे काम केले असल्याचे सांगितले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे मुख्य प्रवर्तक महेश तपासे, विद्याताई वेखंडे, अविनाश थोरात, रूपाली कराळे, शिवसेना ठाकरे गटाचे विश्वास थळे, शंकर खाडे, बाळा धानके, विजय भगत, मधुकर पाटील, अनिल निचिते, सुमित म्हात्रे, रश्मीताई निमसे, देवेंद्र भेरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT