मुंबई

अपक्ष उमेदवार मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद

CD

अपक्ष उमेदवार मागणार
सर्वोच्च न्यायालयात दाद
चेंबूर, ता. १७ (बातमीदार) ः चेंबूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशीष गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांच्या अर्जावर प्रस्तावकाची सही नसल्याच्या कारणावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज बाद केला होता. याबाबत उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली असल्याने सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे.
चेंबूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आशीष गडकरी यांनी चेंबूर नाका येथील निवडणूक कार्यालयात अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला होता. अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही, असा आरोप गडकरी यांनी केला. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळली. अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याकरिता वेळ दिला नाही, त्यामुळे मला निवडणुकीला मुकावे लागत असल्याचा आरोप आशीष गडकरी यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद नसते तर मला ही संधी मिळाली नसती - रामदास आठवले

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टसाठी भारतीय संघात मोठा बदल; कधी अन् कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT