सासूबाईंच्या प्रचारासाठी सूनबाईंची बाईक रॅली
कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात शनिवारी (ता. १६) सायंकाळी महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत सुमारे २०० हून अधिक युवा दुचाकीस्वार सहभागी झाले होते; मात्र सुलभा यांच्या सूनबाई रॅलीचे विशेष आकर्षण ठरल्या. सासूबाईंच्या प्रचारासाठी सून डॉ. जुईली यांनी दुचाकी चालवत या रॅलीचे नेतृत्व केले.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीची सुरुवात श्रीराम चौकातून झाली. पुढे अपर्णा डेअरी -टाटा कॉलनी-म्हात्रे चौक-आमराई चौक (विजयनगर)-तिसगाव मार्गे-२०० फुटी रोड-श्रीमलंग रोड मार्गे चक्कीनाका-पुना लिंक रोड मार्गे तिसगाव नाका-विठ्ठलवाडी बस डेपो येथे समाप्त झाली. या बाईक रॅलीत जवळपास दोनशे युवा दुचाकीस्वार सामील झाले होते. रॅलीत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या सूनबाई डॉ. जुईली वैभव गायकवाड यांनी दुचाकीवरून सहभाग घेतला होता.
"सुलभाताई आगे बढो, हम तुम्हारे साथ है" या गर्जनेने कल्याण पूर्व परिसर दणाणून निघाला होता. सुलभा गायकवाड यांना युवा-युवती, महिला, वृद्ध अशा सर्वच वयोगटातून मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. या रॅलीत गोव्याचे कॅबिनेट मंत्री सुभाष फलदेसाई, जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर भोईर, कल्याण-पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, युवा मोर्चा अध्यक्ष ॲड. सत्येंद्र दुबे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रतिभा लोंढे, तेजस निकम, देवेंद्र पाठक, स्वप्नील म्हस्के, युवा अध्यक्ष रोनक ठाकूर, युवासेना सचिव विकी जोशी, युवती अध्यक्षा दिव्या शिंदे, अतुल पांडे, तसेच महायुतीचे इतर मान्यवर युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.