मुंबई

ठाणे थोडक्यात

CD

ठाणे थोडक्यात
कल्याण पूर्वमध्ये मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅली
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी ठिकठिकाणी होत आहे. शनिवारी कल्याण पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात ज्या प्रभागात कमी मतदान झाले आहे त्या मतदारसंघ परिसरात बाईक रॅलीचे आयोजन केले होते. जे.सी.एस. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाल परिसरात रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच, हाजी मलंग बस स्टॉप येथे नागरिकांना मतदान जनजागृती शपथ दिली. तसेच, त्या ठिकाणी नागरिकांची मानवी साखळी तयार करून मतदान जनजागृती केली. त्यानंतर मानेरे गाव येथील जिल्हा परिषद या शाळेजवळ विद्यार्थ्यांनी रॅलीचे मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन स्वागत केले. यासमयी विविध शाळांतील शिक्षक वर्ग, आरएसपीचे कर्मचारी वर्ग, कल्याण जनजागृती टीम व मैत्री फाउंडेशनचे सभासद तसेच स्वीप टीमचे कर्मचारी विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, समाधान मोरे, रवींद्र तवर, भारती डगळे, प्रणव देसाई, सिनेअभिनेता सुशील राठोड, तुळशीराम झोपे, शिरीष म्हात्रे आदी उपस्थित होते.
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

Stock Market Today: तेलामुळे शेअर बाजार कोसळला! पण गॅस संकटामुळे या कंपन्यांचे शेअर्स 10 मिनिटांत 11% वाढले

Bhandara Accident: सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्याचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू; खानावळीत जेवण करून दुचाकीवरून घरी निघाले अन्..

Kolhapur MPSC Candidate :भावी अधिकाऱ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित, यादी प्रसिद्ध न झाल्याने अस्वस्थता

SCROLL FOR NEXT