मुंबई

ओएलएक्सवरून कार घेणे पडले महागात

CD

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : ओएलएक्सवरून चारचाकी कार विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला एका भामट्याने ६५ हजार रुपयांना गंडा घालून त्याला कार न देता त्याची फसवणूक करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात फसवणूक झालेला रोहित वर्मा (२३) हा तरुण मुंबईतील शिवडी भागात राहण्यास आहे. रोहितला सेकंडहँड कार खरेदी करायची असल्याने त्याने ओएलएक्सवर कारचा शोध घेतला. या वेळी त्याला ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेली हुंडाई आय-१० कार आवडल्याने त्याने कारविक्रेता राहिल सय्यद याला संपर्क साधला. दुसऱ्या दिवशी रोहित वाशी सेक्टर-१ मध्ये आल्यानंतर आरोपी राहिल सय्यदने त्याला कार दाखवली. कार रोहित व त्याच्या मित्रांना आवडल्याने त्यांनी ६५ हजार रुपयांमध्ये विकत घेण्याचा व्यवहार ठरवला. त्यानंतर रोहितने त्याच्या मोबाईलवरून आरोपी राहिल सय्यद याला पाच हजार रुपये टोकन रक्कम पाठवून दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी रोहित आपल्या मित्रांसह कार घेण्यासाठी आल्यानंतर त्याने राहिलच्या मोबाईल फोनवर ६० हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर राहिल सय्यद याने बाजूच्या इमारतीत राहत असल्याचे सांगून घरातून गाडीची मूळ कागदपत्रे व चावी घेऊन येण्याचा बहाणा करून त्या ठिकाणावरून पलायन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT