मुंबई

प्रचारात बॅनरवर वारेमाप उधळण

CD

जागोजागी प्रचाराच्या बॅनरचे ढीग
पालिकेला जागेची कमतरता

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्ष उमेदवाराचा प्रचार समाजमाध्यम, तसेच बॅनरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीणमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. या बेकायदा बॅनरवर पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे, तसेच हजारो बॅनर उतरविण्यात येत असले तरी बॅनर ठेवायचे कुठे, हा प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेला यासाठी जागेची कमतरता जाणवत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रभागांमध्ये रॅली काढून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार शेवटच्या टप्प्यात करत आहेत. विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून आपले उमेदवार जाहीर होतात, पक्षांच्या माध्यमातून या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात विधानसभा क्षेत्रात बॅनरबाजी केली आहे. आतापर्यंत केलेली विकासकामे आणि पुढचे व्हिजन या बॅनरच्या माध्यमातून झळकावले आहे, तसेच प्रभागातील गल्लोगल्ली रस्त्यांवर छोटे-छोटे बॅनर लावत आपल्या उमेदवाराचा चेहरा आणि पक्षाची घोषवाक्ये झळकावण्यात आली आहेत. राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभादेखील शहरांमध्ये होत आहेत. यानिमित्तानेदेखील छोट्या छोट्या बॅनर्स व राजकीय पक्षांचे झेंडे मोठ्या प्रमाणात झळकविण्यात येतात.

विभागीय कार्यालयांच्या आवारात कचरा
बेकायदा बॅनर्सवर पालिका प्रशासनाकडून दररोज कारवाई केली जात आहे. शेकडो बॅनर्स पालिका प्रशासनाने कारवाई करत उतरवले आहेत. हे कारवाई केलेले बॅनर पालिकेच्या विभागीय कार्यालयांच्या आवारात आणून टाकण्यात येत आहेत. यामुळे त्या ठिकाणी या बॅनर्सचा ढीग तयार झाला आहे. जागेची कमतरता पालिकेला भेडसावत असल्याचे चित्र दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

Latest Marathi News Live Update : कच्च्या मालाच्या किमती वाढल्या, गॅस टंचाईचा जालन्यातील स्टील उद्योगालाही फटका...

सूर्यकुमार यादवचं 'Olympics Gold' लक्ष्य; गौतम गंभीरचे धक्कादायक विधान, भारतीय चाहत्यांची चिंता वाढवणारी गोष्ट

सिग्नल तोडला अन् पूजा सावंतला पोलिसांनी पकडलं; आयडीवरचं आडनाव वाचताच... अभिनेत्रीने सांगितला किस्सा

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT