मुंबई

लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमाला

CD

लालबागमध्ये निसर्गावर आधारित विवेकानंद व्याख्यानमाला

शिवडी, ता. १७ (बातमीदार) : दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित केली जाणारी ६७वी विवेकानंद व्याख्यानमाला यावर्षी मंगळवार (ता. २६) ते शनिवार (ता. ३०) या कालावधीत लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (गरमखाडा) येथे दररोज रात्री साडेआठ वाजता आयोजित केली आहे. या वर्षी ‘नाते जोडू निसर्गाशी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित निरनिराळ्या रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
विवेकानंद व्याख्यानमालेतील पहिले पुष्प मंगळवारी (ता. २६) कीटक अभ्यासक नूतन कर्णिक यांच्या ‘जावे मुंग्यांच्या जगात’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. बुधवारी (ता. २७) रोजी वन्यजीव अभ्यासक अनुज खरे हे ‘वाघोबाच्या जंगलात’, गुरुवारी (ता. २८) निसर्गप्रेमी कौस्तुभ ताम्हणकर हे ‘शून्य कचरा व्यवस्थापन’, शुक्रवारी (ता. २९) हत्ती अभ्यासक आनंद शिंदे हे ‘एक संवाद हत्तीशी’ या विषयावर संवाद साधणार आहेत. तर, निसर्ग अभ्यासक किरण पुरंदरे यांच्या ‘जंगलातील ४०० दिवस’ या विषयावरील व्याख्यानाने ६७ व्या विवेकानंद व्याख्यानमालेचा समारोप होईल. पाचव्या आणि अंतिम दिवशी निसर्ग संकल्पनेवर आधारित विवेकानंद स्मृती या जाहिरात अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Heatwave Alert : पुणेकरांनो सावधान! वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका; महापालिकेने दिल्या महत्त्वाच्या सूचना, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा

बाबो! बिग बॉसनंतर छोटा पुढारी सिनेमात दिसणार, पिक्चर बाईज सिनेमामध्ये हटके अभिनय, नेटकरी म्हणाले...

T20 World Cup नंतरही भारतात अडकलेले वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिकेचे अखेर मायदेशी परतणार; ICC कडून तिकीटांची सोय

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe: मेळघाटातील सेवाकार्यासाठी पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना परभणीत दर्पण पुरस्कार

इटलीतील सॅनरेमो म्युझिक फेस्टिव्हलमध्ये कबीर बेदी यांनी साजरे केले ‘सँडोकन’चे 50 वर्षे; "हा भावूक करणारा क्षण"

SCROLL FOR NEXT