मुंबई

प्रचाराचा महारविवार

CD

प्रचाराचा महारविवार
बाईक रॅली, मिरवणुका, भेटीगाठींचा धुरळा : राजकीय वातावरण तापले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : विधानसभा निवडणुकांसाठी मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचाराची सांगता सोमवारी सायंकाळी होणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास हातात असतानाच शेवटच्या रविवारचा बोनस मिळाल्याने सर्वच उमेदवार कार्यकर्त्यांसह आज रस्त्यावर उतरलेले दिसले. बाईक रॅली, भव्य मिरवणुका, घरोघरी भेटीगाठींचा धुरळा उडालाच, पण गल्लीबोळात फिरणाऱ्या प्रचार गाड्यांनी वेग घेतला. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी एकंदरीतच मतदानाआधीचा शेवटचा रविवार हा महारविवार ठरला.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. दोन्ही युती, आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून एकमेकांना जबरदस्त टक्कर देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पत्रकार परिषदा, चौकसभा, मेळावे घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांची मोठी फळी रस्त्यावर उतरवण्यात आली. उमेदवार आपआपल्या प्रमुख नेते आणि स्टार प्रचारकांसह मिवणुका काढताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील, ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात गाजल्या. त्यामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.

प्रचारासाठी काहीच तास शिल्लक
जाहीरनामा, वचननामा घराघरात पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत. एकीकडे सभांचा धुरळा, तर दुसरीकडे रस्त्यांवरून फिरणारे प्रचार रथांच्या आवाजामुळे निवडणूक प्रचाराची रंगत वाढली आहे. निवडणूक प्रचाराची रंगत वाढत असतानाच त्याच्या सांगताचे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे. सोमवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे प्रचार सांगताच्या आधी आलेला रविवार सर्वच उमेदवारांनी सार्थकी लावल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात रॅली, दुपारी प्रचार रथ, भेटीगाठी, तर सायंकाळी ठाण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रचाराची तोफ धडाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT