PM Narendra Modi In Nigeria Sakal
मुंबई

नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले PM मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या नायजेरियाच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या देशाला भेट देणारे ते मागील १७ वर्षांमधील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

सकाळ वृत्तसेवा

PM Narendra Modi In Nigeria Marathi Community

नवी दिल्ली : नायजेरिया दौऱ्यावर पोहोचलेल्या नरेंद्र मोदींचे तेथील मराठी भाषिकांनी जोरदार स्वागत केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल मोदींचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या नायजेरियाच्या दौऱ्यावर आहेत. या देशाला भेट देणारे ते मागील १७ वर्षांमधील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. नायजेरियातील मराठी भाषिकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत मोदींचे स्वागत केले.

नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, "मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी आनंद व्यक्त केला. ते त्यांच्या संस्कृती आणि मुळांशी ज्या पद्धतीने जोडले गेलेत, ते पाहणे अतिशय कौतुकास्पद आहे”

नायजेरियातील अबुजा विमानतळावर मोदींचे स्वागत करून त्यांना मानवंदना देण्यात आली. रविवारी मोदींनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू  यांच्यासोबतही चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT