ऑक्टोबरमध्ये धावल्या
३२६ विशेष गाड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : दिवाळी आणि छटपूजा यांसारख्या सणासुदीच्या कालावधीत मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा दिला. मुंबई विभागाने ऑक्टोबरमध्ये ३२६ विशेष गाड्या चालविण्यात आल्या. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४० टक्के अधिक गाड्या चालवण्यात आल्या आहेत.
मुंबई उपनगर भागात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे छटपूजेसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई विभागाने नियमित आणि विशेष मिळून पाच हजार ६९० मेल/एक्स्प्रेस गाड्या चालविल्या आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात पाच हजार ५२९ गाड्या धावल्या होत्या. एप्रिल-ऑक्टोबर २०२४ या कालावधीत मुंबई विभागाचे एकत्रित व्यावसायिक उत्पन्न ४,२१८.९५ कोटी रुपये आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीत मिळालेल्या ४,०२१.५६ कोटीच्या तुलनेत ४.९१ टक्क्यांनी वाढले आहे.
--------
मालवाहतुकीतून १,४६५ कोटी रुपये
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल-ऑक्टोबर २०२४ या कालावधीत १३.०७ दशलक्ष टन लोडिंगसह १४६५.२४ कोटी महसूल मिळविला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत १,४४७.४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. ऑक्टोबरच्या मालवाहतुकीतून मिळालेले एकूण उत्पन्न २२४.४० कोटी रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.