लाडक्या सुलभाताईला बहुमताने विजयी करा : रवी किशन
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : कल्याण पूर्व मतदारसंघात खासदार रवी किशन यांच्या प्रचार फेरीचे रविवारी (ता. १७) आयोजन केले होते. या फेरीत खासदार रवी किशन यांनी आपल्या भोजपुरी शैलीत सर्व उत्तर भारतीय समाज बांधवांना सुलभाताईंना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन केले.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात आली होती. प्रचार फेरीची सुरुवात अवध रामलीला समिती येथून झाली, पुढे म्हात्रे नाका, काटेमानिवली नाका, नाना पावशे चौक, जनता बँक, काली माता मंदिर येथे समारोप करण्यात आला.
खासदार रवी किशन या वेळी म्हणाले की, आम्ही सरकार स्थापन करत आहोत. येत्या २३ तारखेला महायुती सरकार शपथ घेणार आहे. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसावी, असे आपल्या भोजपुरी अंदाजात सांगितले. या प्रचार फेरीला प्रचंड जनसमुदाय लोटला होता. मी माझ्या लाडकी बहीण सुलभाताई यांच्यासाठी सतराशे किमी लांबून फक्त तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो आहे. माझ्या सर्व उत्तर भारतीय बांधव आणि माझे फॅन्स माझ्या सुलभाताईला प्रचंड बहुमतांनी आपण सर्व निवडून देतील. या वेळी खासदार रवी किशन यांच्यासह सुलभाताई गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष उत्तर भारतीय मोर्चा नागेंद्र फौजदार शर्मा, जिल्हा सरचिटणीस मनोज राय, उत्तर भारतीय आघाडी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष लल्लन कनोजिया, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय उपाध्याय, उत्तर भारतीय मोर्चा कल्याण अध्यक्ष सत्यप्रकाश उपाध्याय, महासचिव अविनाश सिंह, अभिषेक तिवारी, शशी तिवारी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला आघाडी सरचिटणीस निशा सिंग, माजी नगरसेविका हेमलता पावशे, वरिष्ठ सल्लागार प्रशांत राय, रामजीत सिंग, डॉ. पोटदुखे, कैलास पावशे, ॲड. सत्येंद्र दुबे, मृत्युंजय शुक्ला, दीपक गुप्ता, संजय तिवारी, सौरभ सिंग, अमिताभ सिंग, तसेच उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.