मुंबई

डिलीट मतांचा उमेदवारांना बसणार फटका

CD

डिलीट मतांचा उमेदवारांना बसणार फटका
भिवंडी, ता. १९ (बातमीदार) : लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांच्या नावासमोर डिलीट लिहिल्याने त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे हजारो मतदारांनी मतदान केले नाही; मात्र याबाबत स्थानिक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जागृती नसल्याने विधानसभा निवडणुकीतही उमेदवारांना याचा फटका बसणार आहे.

निवडणूक आयोगाने आपल्या राष्ट्रीय कामात जोडलेल्या सुशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य कामे वेळीच केली नाहीत. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांना आपल्या नावापुढे डिलीट लिहिल्यामुळे मतदान करता आले नाही. याप्रकरणी वर्तमानपत्रात बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या होत्या; मात्र तत्कालीन निवडणूक कार्यालयाने मतदार नोंदणी करणाऱ्या बीएलओंची कोणतीही चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केलेली नाही.

अथवा मतदारांनीदेखील आपली नावे बीएलओ यांनी मतदार यादीत का नोंद केली नाहीत, अशा तक्रारीदेखील केल्या नाहीत. दरम्यान, अशा मतदाराने आपली नावे मतदार यादीत तपासून ती दुरुस्त केल्यास त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. वास्तविक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने याबाबत पुढाकार घेऊन मतदारांना मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांना मतदार यादीतील डिलीट नावाची माहिती नसल्याचे सांगून कानावर हात ठेवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काही उमेदवार अल्पमतांनी पराभूत झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रत्येक मतदारसंघाच्या कार्यालयात मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी आवाहन केले जाते. तसेच, मतदार यादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये नावनोंदणी झाल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येते. त्यामुळे मतदारांनी जागृत राहून मतदार यादी नेहमी तपासली पाहिजे.
- उदय किसवे, निवडणूक निर्णय अधिकारी, भिवंडी पश्चिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Umarga Accident : हॉटेलमध्ये कार घूसल्याने दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, उमरगा शहराजवळ झाला अपघात

मुंबईला ये... नाना पाटेकरांमुळे इंडस्ट्रीमध्ये आले मकरंद अनासपुरे; जुनी आठवण सांगत म्हणाले- त्या दिवशी...

Suryakumar Yadav: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी MS Dhoni ला कॉल; सूर्याने सांगितला, 'कॅप्टन कूल'चा सल्ला कसा कामी आला

SCROLL FOR NEXT