मुंबई

असुविधांविरूद्ध बालक, पालक मैदानात

CD

असुविधांविरुद्ध बालक, पालक मैदानात
श्रमिक युवा ग्रुपचा धारावीत कार्यक्रम
धारावी, ता. १९ (बातमीदार) : देशभर साजरा केल्या जाणाऱ्या बालदिनाच्या निमित्ताने धारावीतील बालक आणि पालकांनी एक अनोख्या पद्धतीने बालदिन साजरा करत एक वेगळा संदेश यानिमित्ताने अधोरेखित केला. श्रमिक युवा ग्रुपच्या वतीने धारावीतील कामराज नगर येथे आयोजित केलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात धारावीतील असुविधांकडे लक्ष वेधण्यात आले.
श्रमिक युवा ग्रुपच्या वतीने येथे आयोजित बालदिनाच्या कार्यक्रमाला स्थानिक विद्यार्थ्यांच्या हातून केक कापण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले, चॉकलेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या मुलांनी आपल्या हाती विविध संदेश देणारे फलक घेतले होते. खेळासाठी मैदान नसलेल्या, परिसरात चांगल्या शाळा नसलेल्या, प्रदूषित वातावरणात श्वास घेणाऱ्या मुलांचा बालदिन असा संदेश या फलकांवर लिहिला होता, तसेच आमच्यासाठी चांगल्या शाळा का नाहीत? आम्हाला खेळासाठी मैदान का नाही? आमच्या भविष्याशी खेळ का? आमच्या बालपणाचा आनंद हिरावून का घेता? मुले ही देवाघरची फुले, मग आमच्यावर अन्याय का करता? असे थेट प्रश्नही या फलकांवर विचारण्यात आले होते.

आमच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने धारावीतील मुलांसाठी बालदिन साजरा करताना संमिश्र भावना होत्या. या मुलांसोबत बालदिनाचा आनंद साजरा करतानाच, त्यांना आपण मूलभूत सुविधा देऊ शकत नाही, याबाबत वैषम्यदेखील वाटते. या मुलांना चांगले खेळाचे मैदान, दर्जेदार शाळा, ग्रंथालय, प्रदूषणरहित परिसर यांसह इतर मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा संदेश अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केले होते.
- मीनाक्षी दरवेशी, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Road Accident : परदेशात फिरण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं! पुण्यात नोकरी करणाऱ्या बीडच्या पूजाचा थायलंडमध्ये मृत्यू; दुचाकीवरून फिरताना अपघात

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासून मोठ्या रांगा

स्पेशल चहा बंद, फक्त 'कटिंग'; गॅस टंचाईचा चहा टपऱ्यांना फटका, तर कामगारावर बेरोजगारीचं संकट

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

SCROLL FOR NEXT