मुंबई

मतदानासाठी चोख पोलिस बंदोबस्त

CD

मतदानासाठी चोख पोलिस बंदोबस्त
१०,९३५ पोलिस कर्मचारी, ४,१६१ होमगार्ड, फिरती २४ पथके तैनात
ठाणे, ता. १९ (वार्ताहर) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे. ठाणे जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी १० हजार ९३५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चार हजार १६१ होमगार्ड आणि २४ पोलिसांची भरारी पथके तैनात ठेवली आहेत. सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रांचाही वापर करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतदान सुरळीत व निर्विघ्नपणे पार पडावे, तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाने चोख व्यवस्था ठेवली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील एकूण ७,९८० पोलिस अधिकारी व अंमलदार तैनात केले आहेत. ४,१६१ होमगार्ड, पोलिसांची २४ भरारी पथके, राज्य राखीव पोलिस दल तीन, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दल पाच, केंद्रिय राखीव पोलिस दल तीन, सीमा सुरक्षा दल चार, उत्तराखंड राज्य राखीव दल तीन अशा एकूण १८ कंपन्या, अतिरिक्त मनुष्यबळदेखील तैनात केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT