मुंबई

मतदानाचा हक्क आवर्जून बजवा

CD

मुंबई, ता. १९ ः मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या मतदानासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा, असे आवाहन मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
मतदान मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक व शांततामुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचा यादव यांनी आढावा घेतला. मुंबई शहर जिल्ह्यात येणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १०५ उमेदवारासाठी २५ लाख ४३ हजार ६१० मतदार दोन हजार ५३८ मतदान केंद्रांवर आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत असलेल्या दहा विधानसभा मतदारसंघांत २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्राला प्रत्येकी एक असे २,५३८ बीएलओ आहेत. एकूण ३६४ क्षेत्रीय अधिकारी आहेत. जवळपास १२ हजार ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणुकीसाठी उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT