मुंबई

चोख पोलिस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया

CD

भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पालघर जिल्ह्यातील बोईसर, नालासोपारा, वसई, तर ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर आणि ओवळा-माजिवडा असे एकूण पाच मतदारसंघ येतात. मतदानाच्या निमित्ताने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, यासाठी संपूर्ण पोलिस आयुक्तालयात कार्यक्षेत्रात पाच उप आयुक्त, १२ सहाय्यक आयुक्त, ३८६ अधिकारी, दोन हजार ८४० पोलिस अंमलदार, ८७ पोलिस सेक्टर व पेट्रोलिंग, एक हजार २५० होमगार्ड, केंद्रीय सुरक्षा दलाच्या पाच कंपनी, राज्य राखीव दलाची एक कंपनी व ८८ नागरी संरक्षण स्वयंसेवक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, तसेच पोलिस आयुक्तालय कार्यालय येथे आयुक्त यांचे राखीव तीन स्ट्रायकिंग व परिमंडळ २ व ३ कार्यालय येथे प्रत्येकी एक स्ट्रायकिंग नेमण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

सायबर पथक तैनात
मिरा-भाईंदर, तसेच वसई-विरार शहरामध्ये सामाजिक माध्यमातून संदेश प्रसारित (व्हायरल) होऊन समाजात तेढ निर्माण होणार नाही, यासाठी सायबर कक्षाची पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणुकीदरम्यान एखादा अनुचित अथवा संशयित प्रकार लक्षात आल्यास तत्काळ नजीकचे पोलिस ठाणे अथवा पोलिस आयुक्तालयाचे नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्रमांक ०२२-३५००६१३०, २९४५२१३५ व ७०२१९९५३५२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT