सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेचे ६० हजार कर्मचारी नेमण्यात आले आहेत; पण त्यामध्ये आरोग्य आणि अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा समावेश नसल्याने अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.
मतदानाच्या व्यवस्थेसाठी पालिका आयुक्तांवर प्रथमच मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. पालिकेतील अत्यावश्यक विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले आहे; पण त्यामुळे अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती; पण अत्यावश्यक कामांसाठी गरजेच्या नसलेल्या कर्मचाऱ्यांनाच निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांवर त्याचा काही परिणाम होणार नाही, असे आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.
-------------------------------
मुंबईतील तैनात कर्मचारी
मुंबई शहर आणि उपनगरात निवडणुकीच्या कामासाठी एक लाख कर्मचारी- अधिकारी नियुक्त केले आहेत. मुंबईत मतदान केंद्रांवर शहरात अकरा हजार ५८५, उपनगरात ३५ हजार २३१ असे एकूण ४६ हजार ८१६ कर्मचारी असतील. त्याशिवाय मतदान केंद्रांवरील सूक्ष्मनिरीक्षक म्हणून शहरात ६३९ तर, उपनगरात १,६०२ असे दोन हजार २४१ कर्मचारी असतील. प्रत्येक केंद्रावर किमान पाच पोलिस कर्मचारी असणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.