मुंबई

निवडणूक कर्मचाऱ्यांना ‘बेस्ट’ सुविधा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः निवडणुकीच्या कामासाठी बेस्टकडून ६५७ बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी, पोलिस तसेच दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रांवर सहज पोहोचता यावे, यासाठी ‘बेस्ट’कडून ही सुविधा देण्यात आली आहे; पण बेस्टच्या ताफ्यात मुळातच बस कमी असल्याने मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या कामासाठी बेस्टकडून ६५७ बसपैकी ४२ आसने असलेल्या २३० बस, ३० आसने असलेल्या ४२७ मिडी बस यांचा समावेश आहे. मिडी बसपैकी १२१ बस या नॉन एसी, तर ३०६ एसी बस तैनात असणार आहेत. तर, गरज भासल्यास ज्यादा बसचे नियोजन करण्याची तयारीही बेस्ट उपक्रमाने दाखवली आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांतीलच मतदार तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी विनामूल्य सेवा दिली आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी जाणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे; पण दैनदिन कामांसाठी बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे.
----------------------------
ठरावीक मार्गांवरील थांबे निश्चित
प्रत्येक मतदारसंघात विशेष बससाठी मतदानाच्या दिवशी ठरावीक मार्गिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्टकडून बसथांबेही निश्चित केले गेले आहेत.
---------------------------------
दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था
निवडणुकीच्या दिवशी दिव्यांग व्यक्तींसाठी मुंबईत १,२८४ ठिकाणांपासून मतदान केंद्रापर्यंत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी ९९२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT