मुंबई

आजचा दिवस सुट्टीचा नव्हे, मतदानाचा!

CD

आजचा दिवस सुटीचा नव्हे, मतदानाचा!
सेलिब्रिटी, खेळाडूंचे मतदान करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच शासकीय, निमशासकीय आणि बहुतांश खासगी कार्यालयांना मतदानासाठी सुट्टी असते. मतदारांनी आपली मूलभूत जबाबदारी समजून मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित असते, मात्र अनेक जण मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुटीचा मुहूर्त साधत पिकनिक, फिरायला जाणे पसंत करतात. काही जण घरात असूनही मतदानाला जात नाहीत. त्यामुळेच मतदानाचा दिवस सुटीचा नसून जबाबदारीने मतदान करण्याचा आहे. आम्ही मतदान करणार, तुम्हीही करा, असे आवाहन सेलिब्रिटी, खेळाडूंसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी कमी आहे. आपला मूलभूत अधिकार बजावण्याबाबत मतदार उदासीन असल्याने ५०-६० टक्के एवढे कमी मतदान झाले होते. राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने निवडणूक आयोगाकडून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याची दखल घेत मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी, खेळाडू, तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी विधानसभेसाठी उद्या बुधवारी (ता. २०) प्रथम मतदान करा, मग आपली इतर कामे बघा, पण प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन केले आहे.

गावातल्या लोकांकडून शिकायला हवे
मुंबई-पुण्याच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदानाची टक्केवारी वाढत असल्याचे दिसत आहे. गावात शेतकरी-कष्टकरी राहतात. तरीही न चुकता ते मतदानाचा हक्क बजावत असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून दिसत आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या सुशिक्षित लोकांनी गावातल्या अशिक्षित लोकांकडून काही तरी शिकावे, असे मत अभिनेत्री सायली संजीव यांनी व्यक्त करत मतदान न करणाऱ्याचे कान टोचले आहेत.

मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. काम आहे, वेळ नाही या गोष्टी बाजूला ठेवून सकाळीच मतदान केल्यास दिवसभर आपले काम पाहायला हरकत नाही. मी आज शूटिंगसाठी बाहेर आहे, पण काहीही करून मतदानासाठी बुधवारी पुण्यात जाणार आहे.
- सुबोध भावे, अभिनेता

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे सकाळी मतदान करा, मग बाहेर जा, पण न चुकता मतदान करायलाच हवे.
- सायली संजीव, अभिनेत्री

आपल्या सर्वांना घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मिळालेल्या सुटीकडे सुट्टी म्हणून न पाहता जबाबदारीचा दिवस समजून मतदानाचा हक्क बजवावा. अन्यथा पुढील पाच वर्षे लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या कामकाजावर बोट ठेवण्याचा अधिकार राहणार नाही.
- हार्दिक जोशी, अभिनेता

आपलं सरकार ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकाराची जाणीव ठेवून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. मतदान केले नाही, तर ना सरकारचे कौतुक करण्याचा ना कोणाला जबाबदार धरण्याचा अधिकार राहत नाही. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून जबाबदारीने मतदान करा
- पुष्कर श्रोत्री, अभिनेता


लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान करणार आहे, तुम्हीही मतदान करून हातभार लावा. आपल्या अधिकाराचा विसर पडू न देता मतदानाचे कर्तव्य पार पाडा.
- सचिन तेंडुलकर
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT