वाशी, ता. २४ (बातमीदार) : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे यांच्या वतीने नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नवी मुंबईमधील युनिव्हर्स कराटे मार्शल आर्टस अकॅडमीच्या खेळाडूंनी पाच सुवर्ण, चार रौप्य; तर दोन कांस्यपदके पटकावली. या स्पर्धेमध्ये १०८ शाळांमधून ५७५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुले व मुली यांचा समावेश होता. यामध्ये ईश्वरी पानसरे, सोहम साळुंखे, स्वरा कदम, शरण्या पिंगळे, दर्शन पानसरे यांनी सुवर्णपदक. मिहीर पालकर, आयुष मालुंजकर, रुद्रा पाटील, भावेश चौधरी यांनी रौप्यपदक; तर पार्थ सूर्यवंशी, निलय पिंगळे दोघांनी कांस्यपदक पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांना अकॅडमीचे ग्रँडमास्टर शिहान शिवाजी ढवळे, शंकर शेलार, महेश दाभाडे, सायली सरवणकर, सोहम सरवणकर, सचिन औताडे, सिद्धेश सरवणकर, उदय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले, तसेच कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष सलौद्दिन अन्सारी आणि सचिव संदीप गाडे यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.