मुंबई

कंटेनर अपघातामुळे मुंब्रा बायपास मार्गावर वाहतूक कोंडी

CD

कंटेनर अपघातामुळे मुंब्रा बायपास मार्गावर वाहतूक कोंडी
कळवा, ता. २४ (बातमीदार) : ठाण्याहून मुंब्र्याकडे जाणाऱ्या एका कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर डिव्हायडरला धडकून उलटल्याची घटना रविवारी (ता. २४) सकाळी नऊच्या सुमारास घडली. या अपघातग्रस्त कंटेनरमधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने या मार्गावर चार तास वाहतूक कोंडी झाली. परिणामी, वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागला.

वाड्याहून न्हावा-शेवा येथे मुंब्रा बायपास रस्त्यावरून जाणाऱ्या एका खासगी कंपनीचा कंटेनर २० टन वजनाचा रेझून केमिकल घेऊन जात असताना हा अपघात घडला. मुंब्रा बायपास मार्गावर मुंब्रा देवी मंदिराजवळील क्रेशर मशीनजवळ हा अपघात झाला. कंटेनरचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा कंटेनर डिव्हायडरला धडकून उलटला. यानंतर या अपघातग्रस्त कंटेनरमधील ऑईल रस्त्यावर सांडल्याने या मार्गावर सुमारे चार तास वाहतूककोंडी झाली. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या बाजूला करण्यात आला; मात्र या घटनेमुळे या मार्गावरील वाहनचालकांना सुमारे चार तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT