मुंबई

आमच्या ‘फॅक्टर’ची ताकद महिनाभरात कळेल : जरांगे

CD

आमच्या ‘फॅक्टर’ची ताकद महिनाभरात कळेल : जरांगे
वडीगोद्री (ता. अंबड), ता. २४ : ‘‘मी आणि माझा समाज विधानसभेच्या निवडणुकीत नव्हतो. तरीही आमचा फॅक्टर चालला नाही, अशी चर्चा होताना दिसते. आमच्या फॅक्टरची ताकद एका महिनाभरात कळेल,’’ असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे रविवारी (ता. २४) बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला होता; मात्र समीकरण न जमल्याने त्यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले होते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर ‘जरांगे फॅक्टर चालला नाही’, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. त्यावर जरांगे म्हणाले, ‘‘उमेदवार उभे करण्यासंदर्भात आमचे समीकरण जुळले नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीत उतरलो नाही. या निवडणुकीत समाज बंधनमुक्त होता. त्यांना जे योग्य वाटले ते त्यांनी केले. कोण निवडून आले, कोण हरले याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. महायुतीने गोड बोलून मराठा समाजाची मते घेतली. मराठा समाजाच्या सहभागाशिवाय सरकार येणे शक्य नाही. तुमचे उमेदवार पुन्हा निवडून आले आहेत, सरकारही तुमचे येणार आहे. आता आरक्षणाचा निर्णय लवकर घेण्याची जबाबदारी नव्या सरकारची असेल.’
....................
सत्तेवर कोणी आले तरी आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. तशी तयारी आम्ही केली आहे. आरक्षण लढा पुन्हा उभा राहणार आहे. आमच्यासोबत बेइमानी करू नका.
- मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daund Crime : रुग्णालयाबाहेर कुटुंबावर जीवघेणा हल्ला; ११ जणांविरुद्ध गुन्हा

IND vs SL: रिषभ पंतला नेमकं काय झालंय, विकेटकिपिंग का करत नाहीये? प्रशिक्षकांनी अखेर सत्य सांगितलं

Maharashtra Rain: पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट

Pune Adivasi Students : मांजरीत आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन तापलं; उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली

Arvind Kejriwal : 'आमची सत्ता आली तर, ई-२० पेट्रोलवर ५ दिवसांत बंदी घालणार'... केजरीवाल यांची गोव्यात मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT