खोपटे पुलावरील अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी, अपघाताची भीती
उरण, ता. ३ (वार्ताहर) ः जेएनपीएच्या अनुषंगाने वसविण्यात आलेल्या उरणच्या पूर्व विभागातील बांधपाडा हद्दीतील गोदामे कंटेनर यार्डकडे कंटेनर ट्रेलर पार्किंगला जागा नसल्यामुळे कंटेनर ट्रेलर हे रस्त्यावरच उभे केले जात असून त्याचा रांगा खोपटा पुलापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
खोपटे बांधपाडा हद्दीमध्ये विविध सीएफएस गोदाम रिकामे कंटेनर यार्ड वसविण्यात आले आहेत. यार्ड गोदाम सीएफएस बनविताना त्यामध्ये अवजड वाहने पार्किंगची व्यवस्था असणे बंधनकारक आहे. या गोदामामध्ये दिवसागणिक हजारो कंटेनर यार्डमध्ये उतरविण्यासाठी येत आहेत; मात्र कंटेनर यार्डमध्ये पार्किंगची व्यवस्था आणि कंटेनर ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने ते रस्त्यावर उभे करीत आहेत. त्यांच्या रांगा या खोपटा पुलापर्यंत जाऊन हे कंटेनर खोपटा पुलावर पार्किंग करून ठेवले आहेत.
उरण तालुक्यात असे अनेक कंटेनर यार्ड आणि गोदामे आहेत. त्यांच्याकडे वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे हे कंटेनरचालक बेकायदेशीरपणे ही वाहने रस्त्यावर उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात; मात्र वाहतूक पोलिसांच्या नजरेतून ही वाहने निसटत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीतून कधी कधी मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होते. तर, या वाहने पार्किंगमुळे अनेक निष्पाप दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याच्या घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या वाहनचालकांवर आणि कंटेनर यार्ड मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी या मार्गावरील प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.