कामोठेतील व्यक्तीची आर्थिक फसवणूक
पनवेल, ता. २९ (वार्ताहर) : कामोठे येथील अमोल गुरव यांना सायबर चोरट्याने बॅंकेचे बनावट ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख ६४ हजारांचे परस्पर व्यवहार करून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्याविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल गुरव यांना बुधवारी (ता. २०) दुपारी सायबर चोरट्याने इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधील कर्मचारी असल्याचे भासवून गुरव यांना संपर्क साधला होता. त्यानंतर चोरट्याने गुरव यांचे नाव, जन्मदिनांक याबाबत माहिती देऊन त्यांना क्रेडिट कार्डवर जास्त सर्व्हिस कर आकारण्यात येत असल्याचे सांगितले. सर्व्हिस कर कमी करण्यासाठी त्यांना इंडसइंड बँकेचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यासाठी चोरट्याने त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून दिली. गुरव यांनी चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठवलेल्या लिंकद्वारे बँकेचे ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर काहीवेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर एक लाख ६४ हजार रुपये किमतीचे व्यवहार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुरव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.