ट्रेलरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर): उरण जेएनपीटी येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गन्नवारपू शिवाप्रसाद (वय ४४) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात बुधवार (ता. २७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलसमोर घडला. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी अज्ञात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
डिलिव्हरी बॉय गन्नवारपू हे सीबीडीतील अपोलो हॉस्पिटललगत सेक्टर-२३ मध्ये असलेल्या स्विगी इन्स्टामार्टमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गन्नवारपू हे डिलिव्हरी पोहोचवून दुचाकीवरून सीबीडी येथून आपल्या शॉपमध्ये जात होते. या वेळी ते अपोलो हॉस्पिटलसमोर आले असता उरण येथून ठाण्याच्या जाणाऱ्या भरधाव कंटेनर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गन्नवारपू हे गंभीररीत्या जखमी झाले. अपघातग्रस्त गन्नवारपू यांना साहिल सय्यद व अयास कुरेशी यांनी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.