वर्ध्याच्या दाते संस्थेचे भोळे-सुमंत स्मृती पुरस्कार जाहीर
डॉ. सुनीलकुमार लवटे यांना जीवनगौरव पुरस्कार, सरफराज अहमद, शुभदा देशमुख, सोमिनाथ घोळवे मानकरी
वर्धा, ता. २९ ः येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने गत दीड दशकापासून ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या वर्षाच्या पुरस्कारासाठी सरफराज अहमद (सोलापूर), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभदा देशमुख (कुरखेडा-गडचिरोली), युवा संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे (पुणे) यांची निवड करण्यात आली. जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ संशोधक, विचारवंत, अनुवादक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ व दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी दिली आहे.
या पुरस्काराचे वितरण पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात २४ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. डॉ. यशवंत सुमंत कुटुंबीयांच्या वतीने गत पाच वर्षांपासून ज्येष्ठ अभ्यासकांसाठी जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. यावर्षीच्या पाचव्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने नुकतेच प्रकाशित केलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय १८ खंडाचे संपादक असलेले ज्येष्ठ संशोधक डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. हाशम शेख (वर्धा), डॉ. अशोक चौसाळकर (कोल्हापूर), डॉ. चैत्रा रेडकर, विजया भोळे, हिरण्यमय भोळे, माधुरी सुमंत (पुणे) व किशोर बेडकीहाळ (सातारा) आदी मान्यवरांनी काम केले, अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे पुरस्कार समितीचे संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे व संस्थेचे संजय इंगळे तिगावकर यांनी दिली.
............
डॉ. सुनीलकुमार लवटे Media Id: NGP24G94154
सरफराज अहमद Media Id: NGP24G94155
शुभदा देशमुख Media Id: NGP24G94156
सोमिनाथ घोळवे Media Id: NGP24G94157
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.