मुंबई

नऊ महिन्यांच्या बाळावर हल्ला

CD

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : रस्त्यावर शौच केल्याच्या किरकोळ कारणावरून एकाने शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या नऊ महिन्यांच्या बाळावर लोखंडी सळई आणि कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. बेलापूर गावातील पंचशील नगर झोपडपट्टीत गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
बेलापूर गावातील स्मशानभूमीलगतच्या पंचशील नगर झोपडपट्टीत अंजली खंदारे ऊर्फ अंजली उस्मान मोह शेख (३७), तिचा पती उस्मान शेख (४०) आणि नऊ महिन्यांचा त्यांचा मुलगा अफान आणि दोनवर्षीय मुलगा अयानसोबत राहतात. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अयानने घरासमोरील रस्त्यावर शौच केले होते. त्याचा राग आल्याने शेजारी राहणाऱ्या राजू सट्टाने शेख दाम्पत्याला शिवीगाळ करत लोखंडी सळई, कुऱ्हाड घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अंजलीच्या हातामध्ये असलेला तिचा नऊ महिन्यांचा लहान मुलगा अफानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर मुलाला वाचवण्यासाठी घराबाहेर पाळलेल्या अंजलीसह तिचा पती उस्मानदेखील जखमी आहे. या घटनेनंतर तिघांना नेरूळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर एनआरआय पोलिसांनी फरारी असलेल्या राजू सट्टाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT