मुंबई

स्थानिक कोळी महिलांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना पिटाळले

CD

स्थानिक कोळी महिलांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांना पिटाळले
कामोठे, ता. ३ (बातमीदार) : टोपलीतून मासे विक्री करणाऱ्या परप्रांतीयांमुळे स्थानिक मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. नवीन पनवेल येथे मासे विक्री करणाऱ्या परप्रांतीयांना काही स्थानिक महिला मासे विक्रेत्यांनी पिटाळून लावल्याची घटना घडली आहे. त्‍यामुळे पुन्‍हा स्‍थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद पेटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये शिवा कॉम्प्लेक्स परिसरात स्थानिक कोळी, आगरी महिला मासे विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. चोखंदळ खवय्ये या ठिकाणाहून मासे विकत घेऊन जातात. याव्यतिरिक्त अभ्युदय बँक परिसरात पदपथावर मोजक्या महिला मासे विकतात. माशांची वाढती मागणी लक्षात घेऊन परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी नवीन पनवेल शहराकडे मोर्चा वळवला आहे. ससून डॉक, क्रॉफर्ड मार्केट, भाऊचा धक्का येथून टोपलीतून भरून आणलेली मच्छी ते दारोदारी फिरून विकतात. दुपारपर्यंत मासे विकून झाल्यावर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने परततात. किफायतशीर किमतीत मासे मिळत असल्याने खवय्यांचा परप्रांतीय मासे विक्रेत्यांकडे कल वाढत आहे. तसेच घरबसल्या मासे मिळत असल्याने बाजारात जाण्यासाठी लागणारा वेळ आणि इंधनासाठी लागणारा पैसा यांची बचत होत आहे. याचा परिणाम स्थानिक मासे विक्रेत्यांवर होत आहे. त्‍यामुळे काही स्थानिक महिलांनी नुकतेच नवीन पनवेल सेक्टर ७ व ८ या विभागांत मासे विक्री करण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मासे विक्रेत्यांना गाठून त्यांना मासे विक्री करण्यास मज्जाव केला. तसेच मासे विक्री न करण्याबाबत सज्जड दम दिला. या वेळी स्‍थानिक कोळी महिलांचा रुद्रवतार पाहून परप्रांतीय मासे विक्रेत्यांनी शहरातून काढता पाय घेतला. दरम्यान, रविवारी पुन्हा परप्रांतीय मासे विक्रेते नवीन पनवेल परिसरात मासे विकताना दिसून आले, मात्र त्यांची संख्या रोडावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT