मुंबई

तीन वर्षांत ४० हजार सुपारी रोपांची विक्री

CD

श्रीवर्धन, ता. ३ (वार्ताहर) ः तालुक्यातील सुपारी बागायतदारांचे निसर्ग व तौक्‍ते चक्रीवादळांत मोठे नुकसान झाले. दोन्ही वादळात तालुक्यातील ७० टक्के पोफळींचे नुकसान झाले, तर उर्वरित पोफळींवर रोगराई, किडींचा प्रादुर्भाव झाल्याने श्रीवर्धन रोठा सुपारीच्या उत्‍पादनावर मोठा परिणाम झाला. गेल्‍या दोन-वर्षांत बागायतदारांनी जोमाने सुपारीची लागवड केली असून लवकरच उत्‍पादन हाती येण्याची शक्‍यता आहे.
चक्रीवादळापूर्वी श्रीवर्धन तालुक्यात ३६५.२५ हेक्टर क्षेत्रात रोठा सुपारीची लागवड होती. सुपारीला समुद्रकिनाऱ्यावरील गाळाची, पाण्याचा निचरा होणारी, तसेच बारमाही ओलावा असणारी जमीन मानवते. त्याचप्रमाणे २० ते ३५ सेल्सिअस तापमान योग्य आहे. रोठा सुपारीत पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून खाण्यास मऊ व फळाचा आकार आकर्षक असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो. रोठ्याचे वार्षिक उत्पादन ६२६.१७ मेट्रिक टन इतके होते. एका हेक्टर क्षेत्रात २.२५ मेट्रिक टन उत्पादकता असल्याने नैसर्गिक आपत्ती येण्याआधी तालुक्यातील बागायतदारांचे २०१५ ते २०२० या पाच वर्षांतील सरासरी उत्पन्न अंदाजे तीन कोटी पंचाहत्तर लाख इतके होते, मात्र निसर्ग चक्रीवादळाने सुपारी बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळामुळे उंच पोफळी भुईसपाट झाल्या. अनेक पोफळींना उभ्या चिरा गेल्‍या. त्‍यात पावसाचे पाणी साठल्याने बुरशी धरली. जेमतेम ३० टक्के पोफळींनी तग धरला होता, परंतु तौक्‍ते चक्रीवादळात या पोफळींचे नुकसान झाले. वादळानंतर पोफळीला खवले कीड, कोळ रोग (फळाची गळ) अळंबी (मुळ कुजणे) बांड रोग अशा रोगराईने घेरले. निसर्गाच्या लहरीपणाने श्रीवर्धन रोठा सुपारीचे उत्‍पादनात मोठी घट झाली आहे. सुपारी बागायतदारांनी पुन्हा जोमाने रोठा सुपारी लागवडी केली आहे. श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व तालुक्यातील खासगी नर्सरीतून बागायतदार सुपारीची रोपे खरेदी करीत वाड्यांमध्ये रोठा लागवडीला प्राधान्य देत आहेत.

बाणावली नारळ दुर्लक्षित
निसर्ग चक्रीवादळानंतर सात हजार, तर तौक्‍ते चक्रीवादळानंतर ३४,७३५ असे एकूण ४१,७३५ इतक्‍या संख्येने रोठा सुपारीच्या रोपांची विक्री श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र व तालुक्यातील खासगी नर्सरींमधून झाली आहे. कोकण भागात हमखास उत्पन्न व उत्पादन देणारा बाणावली नारळाच्या लागवडीकडे मात्र बागायतदारांनी दुर्लक्ष केले आहे.

रोठा बागायतदारांबाबत सरकार उदासीन
सध्याच्या परिस्थितीत रोठा सुपारीला बाजारात चांगला भाव कसा मिळतो आहे. तालुक्यात सुपारीची प्रोसेसिंग युनिट कशी सुरू करता येईल, याबाबत राज्य सरकारने विचार करणे आवश्‍यक आहे. सुपारीचे ‌आयुर्वेदिक महत्त्व लोकांना पटणे महत्त्वाचे आहे. सुपारी लागवडीकरिता बागायतदारांना सरकारने शंभर टक्के अनुदानात्मक लागवडीसाठी प्रोत्साहन द्यायला हवे, अशी मागणी रोठा बागायतदारांनी केली आहे.

श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्रातून निसर्ग व तौक्‍ते चक्रीवादळानंतर शक्य होतील तेवढी रोठा सुपारीची रोपे बागायतदारांना पुरवली आहेत. तालुक्यात, तसेच पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सुपारी बागायतदारांना रोठा सुपारीची रोपे पुरवण्याचे काम सुरू आहे. या हंगामासाठी १५ हजार रोठा सुपारीची रोपे तयार केली आहेत. त्यापैकी जून ते नोव्हेंबरअखेर सहा हजार रोपांची विक्री झाली आहे.
- डॉ. सिद्धेश सावंत, अधिकारी, श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT