मुंबई

तंत्रशास्त्र विद्यापीठ पदविकाविभागाचे मार्कशिट रखडले

CD

तंत्रशास्त्र विद्यापीठ पदविका विभागाचे मार्कशीट रखडले
शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
माणगाव, ता. ३ (बातमीदार) ः लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदविका विभागाचा गेल्या वर्षी घेतलेल्या परीक्षेच्‍या निकालाचे मार्कशीट तांत्रिक कारणामुळे रखडले आहे. त्यामुळे मार्कशीटविना विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे प्रवेश रखडले आहेत. दरम्यान, प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असल्याने विद्यार्थ्यांना आता दंडाची रक्कम भरून प्रवेश घ्यावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक त्याचबरोबर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणेरे येथील डॉ. आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाला राज्यातील जवळपास सर्वच तंत्र महाविद्यालये संलग्न करण्यात आली आहेत. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांचा निकाल विद्यापीठातून लावण्यात येतो, मात्र सॉप्टवेअर बंद असल्याने गेल्या वर्षी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मार्कशीट अद्यापही दिले गेले नसल्याने लोणेरे येथील इन्सिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक या पदविभागासह संलग्न सर्वच महाविद्यालयातील विद्यार्थांना पुढील वर्षात प्रवेश घेणे अवघड झाले आहे. याबाबत अनेक विद्यार्थी विद्यापीठात येऊन मार्कशीटसाठी ठाण मांडून बसत आहेत. आयओपीमधील विद्यार्थी त्यांच्या संबंधित हेड ऑफ डिपार्टमेंटकडून मार्कशीट घेऊन आयओपीच्या प्राचार्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यासाठी सादर करतात, मात्र यंदा प्राचार्य मार्कशीटशिवाय प्रवेश देण्यास तयार नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
..............................
१० डिसेंबरपर्यत निकालाची प्रक्रिया पूर्ण
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव आणि आयओपीचे प्राचार्य डॉ. मधुकर दाभाडे यांनी मार्कशीट तयार करणारे सॉफ्टवेअर गेल्या जानेवारीपासून बंद असल्याचे सांगितले. त्‍यामुळे सर्वच विद्यार्थ्यांची मार्कशीट मॅन्युअल तयार करण्याचे काम सुरू आहे. नवीन सॉप्टवेअरसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून आचारसंहिता लागल्याने अंमलबजावणी करण्यास विलंब झाला होता, मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा वेगाने सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, तसेच १० डिसेंबरपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना मार्कशीट दिले जाऊन १५ डिसेंबरर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, ॲडमिशन घेण्याची मुदतदेखील वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.......................
विद्यापीठात जे सॉफ्टवेअर वापरले जात होते, त्यामध्ये अनेक घोळ झाले असल्याचे निदर्शनास आल्यावर आम्ही ते सॉफ्टवेअर काढून टाकले आहे. त्याचे बिलही विद्यापीठाने दिलेले नाही आणि त्या सॉफ्टवेअर कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. नवीन सॉफ्टवेअर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असून १० डिसेंबरपर्यंत रिझल्ट लावण्यात येतील आणि प्रवेश प्रक्रियाही १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
डॉ. के. व्ही. काळे, कुलगुरू

कोट
आयओपीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे मार्क विद्यापीठाला कळवण्यात आले असून जसजसे त्यांच्याकडून रिझल्ट लागून मार्कशीट येते, तसतसे विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला जात असून जवळपास ९० टक्के प्रवेशाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही विद्यार्थ्यांचा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी प्रवेश घेण्याची मुदत वाढविण्यात येईल.
डॉ. मधुकर दाभाडे
प्राचार्य आय. ओ. पी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs JPN : मोठा वाद! श्रेयस अय्यर भांडला, अम्पायरने निर्णय बदलला; तसं नसतं झालं तर जिंकला असता जपान, नेमकं काय घडलं ?

आता फक्त Call-SMSचा प्लान, कंपन्यांना बंधनकारक; रिचार्ज होणार स्वस्त, TRAIचा मोठा निर्णय

Mark Wood Retirement: दोन वर्ल्ड कप जिंकणाऱ्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा; ३६ व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

दुष्काळाची अधिसूचना शनिवारपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Tata Group: टाटा समूहाच्या वादात शरद पवारांची एन्ट्री! टाटा ट्रस्टबाबत पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT