खारघर, ता. ३ (बातमीदार) : युथ फॉर युनिटी अँड व्हॉलंटरी ॲक्शन अर्थात ‘युवा’ या संस्थेला ४० वर्षे पूर्ण झाली. निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या एका प्रकल्पाचे १९८४ साली ‘युवा’ या सामाजिक संस्थेत रूपांतर झाले. संस्थेचा चार दशकांचा प्रवास काल शनिवारी (ता. ३०) खारघरच्या युवा सेंटरमध्ये साजरा करण्यात आला. या वेळी मुंबईसह राज्यभरातून, तसेच आसाम आणि झारखंड येथून कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. चार दशकांचा प्रवास प्रदर्शन व विविध माध्यमातून मांडण्यात आला होता. कार्यक्रमात ४० वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन संस्थेचे संस्थापक मिनार पिंपळे, मणी मिस्त्री, संचालक रोशनी नुगेहल्ली, अध्यक्ष अर्चना श्रीवास्तव, माजी अध्यक्ष लता नारायण, नसरीन, राजू भिसे, अनिल इंगळे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चार दशकांपासून युवा संस्थेने लोकांना सुरक्षित आणि सन्मानाने जगण्यासाठी सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून नेतृत्व केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.